Share

धुळ्यात मुलं पळविणारी टोळी समजून ५ जणांची हत्या

Published On: 

🕒 1 min read

टीम महाराष्ट्र देशा- राज्यातील विविध भागात मुलं पळवणाऱ्या  टोळींच्या अफवेने भीतीचे वातावरण आहे. यातूनच मारहाणीच्या घटनाही घडत आहे. अशीच एक घटना धुळ्यातील साक्री तालुक्यात घडली आहे. यात जमावाने केलेल्या मारहाणीत ५ जण ठार झाले आहेत.या घटनेमुळे राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन-तेरा झाल्याचं अधोरेखित झालं आहे.

साक्री तालुक्यातील राइनपाडा या गावात ही घटना घडली आहे. रविवारी दुपारी बाजाराच्या ठिकाणी एका टेम्पोमधून काही लोक आले होते. सुरुवातीला स्थानिक लोकांना ही मुले पळवणारी टोळी असल्याचा समज झाला. त्यानंतर सर्वत्र ही अफवा पसरली त्यामुळे या व्यक्तींभोवती जमाव वाढत गेला आणि त्यांनी यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. अनेक काळ बेदम मारहाण केल्याने अखेर यातील ५ जणांचा जागीच मृत्यू झाला.

पोलिसांना या घटनेची माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, संतप्त आणि आक्रमक झालेल्या जमावामुळे काही वेळातच या व्यक्तींचा मृत्यू झाला. या गंभीर घटनेची दखल पोलिसांनी घेतली असून कोणतीही शहानिशा न करता केवळ अफवेमुळे बेदम मारहाण करणारे लोक कोण होते. यांचा तपास ते घेत आहेत, असे सुत्रांकडून कळते.

मृतांपैकी काहीजण सोलापूर जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे कळते. धुळे जिल्ह्यात पहिल्या पावसानंतर शेतीच्या कामांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे अनेक शेतमजूर जिल्ह्यात दाखल होत आहेत. मृत्यू झालेले लोकही मजूरच असावेत असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, याबाबत अद्याप त्यांची ओळख स्पष्ट झालेली नाही.

पीव्हीआरच्या मॅनेजरला मारहाण केल्याप्रकरणी मनसेच्या किशोर शिंदेंना अटक

महाराष्ट्र बंदला ‘हिंसक’ वळण कोल्हापूरमध्ये पोलिसांना मारहाण

मांजरावरील वादातून महिलेचा खून

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!