Share

“सातबाऱ्यावर आदिवासींच्या मालकी हक्काची नोंद करू…”- रामदास आठवले

Published On: 

🕒 1 min read

अहमदनगर: रिपब्लिकन पक्षाचे उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष संदीप देवरे यांनी पिंपळनेर येथे आदिवासी दलित बहुजन मेळाव्याचे आयोजन केले होते. त्या मेळाव्यास प्रमुख मार्गदर्शक म्हणून केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आठवलेंनी विविध सामाजिक मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी बोलताना आठवले म्हणाले कि, धुळे, नंदुरबार यासह राज्यातील आदिवासीच्या ताब्यातील जमिनीचे वनहक्क दावे मंजूर करून आणि सातबाऱ्यावर आदिवासींची मालकी हक्काची नोंद करून, सातबारा आदिवासींना मिळवून देणार आहोत.

तसेच येत्या काळात आदिवासी मुलांच्या कुपोषणासह आरोग्य, शैक्षणिक आणि रोजगार विषयक अनेक समस्या सोडविण्यासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय मंत्रालयातर्फे वन विभाग, आदिवासी मंत्रालय, राज्य सरकारचे संबंधित अधिकारी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेऊ, असे आश्वासन देखील रामदास आठवले यांनी दिली. राज्यात सध्या झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांना राज्य सरकारने तत्काळ नुकसानभरपाई द्यावी, या मागणीचे पत्र आपण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवणार आहोत, असेही आठवले यांनी यावेळी सांगितले.

महिला आरक्षणाबद्दल बोलताना आठवले म्हणाले, महिलांना विधानसभा आणि लोकसभेत ३३ टक्के आरक्षण देण्याची गरज आहे. त्यात दलित आणि आदिवासी महिलांना आरक्षण अंतर्भूत करण्याची गरज आहे.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!