Share

अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्रासाठी करण्यात आल्या “या” महत्वाच्या घोषणा!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: वर्ष 2022-23 वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधीमंडळात सादर केला. सर्वसामान्य लोकांना आर्थिक दिलासा देणाऱ्या घोषणा केल्या गेल्या. यामध्ये आरोग्य विषयक महत्वाच्या घोषणा केल्या आहेत. त्या कोणत्या? पाहूया सविस्तर..

आरोग्य विषयक महत्वाच्या घोषणा –

१) 11 हजार कोटींचा निधी आरोग्य सेवांवर खर्च करण्याचे नियोजन आहे.
२) हिंगोली, यवतमाळ, बुलढाणा, सांगली , सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, वर्धा, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर ,रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड येथे प्रत्येकी 100 खाटांची स्त्री रुग्णालये स्थापन करणार.
३) टाटा कॅन्सर रूग्णालयाला आयुर्वेदिक रूग्णालय उघडण्यासाठी रायगड खालापूर येथे 10 हेक्टर जमीन देण्यात येणार आहे.
४) कुटुंब आणि नियोजन विभागाला 3,183 कोटी प्रस्तावित.
५) पुणे जिल्ह्यात इंद्रायणी हे आरोग्य रिसर्च सेंटर उभारण्यात येईल. एकाच ठिकाणी संशोधन, रूग्णालय फिझीओथेरपी इत्यादी अश्या सेवा एकाच ठिकाणी असतील. हे देशातील सर्वात मोठं रिसर्च सेंटर असेल.
६) कोरोना काळात राज्यात वैद्यकीय ऑक्सिजनचा तुटवडा होता. 1,400 मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती राज्य करू लागलं. राज्य याबाबत स्वयंपूर्ण झालं असल्याचे सांगितले.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!