🕒 1 min read
मुंबई: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Finance Minister Ajit Pawar) आज विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच इतर प्रमुख नेत्यांची उपस्थिती आहे. ‘पंचसूत्री’ विकासाच्या धोरणावर आधारित २०२२-२३ च्या अर्थसंकल्पात कृषी, आरोग्य, मनुष्यबळ, दळणवळण आणि तंत्रज्ञान ही विकासाची पंचसुत्री असल्याचे अजित पवारांनी म्हटले आहे.
आरोग्यविषयक घोषणा-
सार्वजनिक आरोग्य विभागासाठी 8 हजार 955 कोटी 29 लाख रुपये तर वैद्यकीय शिक्षण विभागासाठी 1 हजार 941 कोटी 64 लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना महाराष्ट्रात वैद्यकीय शिक्षण घेता यावे म्हणून तरतूदी करण्यात येणार. आरोग्य संस्थांचे बांधकाम व श्रेणीवर्धनासाठी 7 हजार 500 कोटी रुपये किमतीचा प्रकल्प येत्या चार वर्षांत पूर्ण करण्यात येईल. कर्करोगाच्या निदानासाठी राज्यात 150 रूग्णालयांमध्ये सुविधा. सिंधुदूर्ग, उस्मानाबाद, नाशिक, रायगड आणि सातारा येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालये. अमरावती व परभणी येथेही वैद्यकीय महाविद्यालये स्थापन करणार.
तसेच दिव्यांग व्यक्तींच्या गरजा ओळखून त्यांना मदत होईल असे वेब अॅप्लिकेशन तयार करणार. सोबतच आता नियमित अर्थसंकल्पीय निधी व्यतिरिक्त येत्या तीन वर्षांत आरोग्य सेवांवर ११ हजार कोटी खर्च (11000 crore to be spent on health services) करण्याचा संकल्प महाविकास आघाडी सरकारने समोर ठेवला आहे. यावेळी त्यांनी
“निष्ठेने केली सेवा, ना केली कधी बढाई
दिला शब्द राज्याला की, धैर्याने जिंकू लढाई
लढाई लढताना विजयाची जागवली आशा
देशाने पाहिले अवघ्या आम्ही योग्य दाखवली दिशा”,
असे म्हणत कोविड योद्धा आणि मविआ सरकारचे कौतुकही केले.
शैक्षणिक तरतुदी-
अनुसुचित जाती व नवबौध्द घटकांतील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक जिल्ह्यातील एका शासकीय निवासी शाळेमध्ये पथदर्शी तत्वावर इयत्ता 6 वीपासून सी. बी. एस. ई. अभ्यासक्रम सुरू करणार.मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयाला १० कोटींचा निधी देण्यात येईल. बाळासाहेब पाटील कृषी संशोधन केंद्र स्थापन करणार. मुख्यमंत्री अन्न व प्रक्रिया योजना राबवण्यात येणार. कोकण कृषी आणि वसंतराव नाईक विद्यापीठांना 50 वर्ष पूर्ण होणार असल्याने 50 कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात येईल. हिंगोली, वर्धा, यवतमाळ, बुलडाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदूर्ग, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड येथे प्रत्येकी १०० खाटांचे स्त्री रोग रुग्णालय स्थापन करण्यात येतील. तसेच उच्च व तंत्र शिक्षण विभागासाठी १,१६० कोटींच्या निधीची तरतूद आणि शालेय शिक्षण विभागासाठी २,३५४ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे.
महिला व बाल विकास तरतुदी-
एकात्मिक बाल विकास योजनेची अंमलबजावणी योग्यरित्या करण्यासाठी e – शक्ती योजनेतून 1 लाख 30 हजार अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षक भगिनींना मोबाईल सेवा उपलब्ध करुन देण्यात येईल. 0 ते 18 वयोगटातील बालकांचे पालन करणाऱ्या संस्था किंवा कुटुंबाला दर महिन्याला देण्यात येणाऱ्या प्रति बालक अनुदानात 1125 रु वरून 2500 रुपयांपर्यंत वाढ करण्यात येणार आहे.
तसेच जिल्हा वार्षिक योजनेतील एकूण निधीपैकी तीन टक्के निधी महिला व बाल विकास योजनेसाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी अमृत महोत्सवी महिला व बाल भवन उभारण्यात येणार आहेत. नागरी भागातील अति तीव्र कुपोषित बालकांसाठी ग्राम बाल विकास केंद्राच्या धर्तीवर नागरी बालविकास केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असून सन 2022-23 वर्षासाठी महिला व बालकल्याण विभागासाठी 2 हजार 472 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे.
कृषी-
जलसंपदा विभागाला १३ हजार २५२ कोटींची तरतूद दोन वर्षांत १०४ सिंचन प्रकल्प पूर्ण करणार. मदत व पुनर्वसन विभागास 11 हजार 454 कोटी 78 लाख 62 हजार रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्यांना ५० हजारांऐवजी ७५ हजार रुपयांचे अनुदान देणार. ४३ लाख १२ हजार लाभ मिळणर आहे. सोबतच कृषी संशोधनासाठी अधिकचा निधी निर्माण करून शेतकऱ्यांसाठी १० हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना कृषीपंप वीज जोडणी देण्याकरीता महावितरण कंपनीला दरवर्षी 1 हजार 500 कोटी रुपये निधी भागभांडवल देण्यात येणार आहे. शरद पवार ग्राम समृध्दी योजनेअंतर्गत लाभार्थींना गाय किंवा म्हशींचा पक्का गोठा बांधण्यासाठी, शेळीपालन किंवा कुकुटपालनाची शेड बांधण्यासाठी तसेच कंपोस्टींगकरता अनुदान देण्यात येणार आहे.
आता प्रत्येक तालुक्यात किमान एक, याप्रमाणे सुमारे 500 नवीन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भाजीपाला रोपवाटिका स्थापन करणार. कृषी उत्पन्न बाजार समित्यांचे बळकटीकरण करण्यासाठी दोन हजार कोटी रुपयांची योजना आखण्यात आली आहे. ६० हजार कृषी पंपांना वीज जोडणी देणार. मुंबईतील पशुवैद्यकीय महाविद्यालयाला १० कोटींचा निधी. महिला शेतकऱ्यांसाठी कृषी योजनांमध्ये राखीव असलेली ३० टक्केची तरतूद आता वाढवून ५० टक्के केलेली आहे. गोसीखुर्द प्रकल्पासाठी ८५० कोटी रूपये उपलब्ध करून देणार. बाळासाहेब पाटील कृषी संशोधन केंद्र स्थापन करणार.
मुख्यमंत्री अन्न व प्रक्रिया योजना राबवण्यात येणार आहे. कोकण कृषी आणि वसंतराव नाईक विद्यापीठांना 50 वर्ष पूर्ण होणार असल्याने 50 कोटींचा निधी देण्यात येईल. हळद संशोधन साठी 100 कोटी देण्यात येणार. विदर्भ आणि मराठवाडा सोयाबीन केंद्र, 3 वर्षात 1 हजार कोटी खर्च करणार. तसेच यंदाच्या वर्षात 60 हजार कृषी पंपांना वीज देणार, 1 लाख हेक्टर क्षेत्रावर फळबागा उभारण्याचं लक्ष्य असल्याचे अजित पवार यांनी म्हटले आहे.
इतर तरतुदी-
एसटी महामंडळासाठी मोठी तरतूद
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांसाठी ४ हजार १०७ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. महामंडळाला ३ हजार नव्या पर्यावरणपूरक बसगाड्या उपलब्ध करून दिल्या जातील. बसस्थानकांचा दर्जा सुधारण्यासाठी, त्यांच्या पुनर्बांधणीसाठी अर्थसाहाय्य उपलब्ध करून दिलं जाईल. परिवहन विभागासाठी ३,००३ कोटींची तरतूद करण्यात आली आहे.
हवेलीत संभाजीराजेंच स्मारक उभारणार-
अजित पवारांनी हवेलीत छत्रपती संभाजी राजेंचे स्मारक (memorial of Chhatrapati Sambhaji Raje) उभारणार असल्याची घोषणा केली आहे. यासाठी २५० कोटी खर्च केले जाणार आहेत.
तृतीय पंथीयांना स्वतंत्र ओळखपत्र आणि रेशन कार्ड –
मविआ सरकारने तृतीय पंथीयांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. त्यांना स्वतंत्र ओळखपत्र आणि रेशन कार्ड देण्यात येणार आहे. सोबतच तृतीयपंथी घटकातील लाभार्थ्यांसाठी बीज भांडवल योजना सुरू होणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- “…म्हणून चार राज्यात भाजपला एकहाती सत्ता मिळाली”, भाजप आमदाराने सांगितले कारण
- ‘एक महानायक डॉ.बी.आर.आंबेडकर’ने ५०० एपिसोड्स केले पूर्ण!कलाकार व टीमने आनंद साजरा करत…
- IND vs SL: चाहत्यांसाठी खुशखबर! बंगळुरू येथे होणाऱ्या डे नाईट कसोटीसाठी मैदानावर १००% प्रेक्षकांना परवानगी
- सोयाबीन दरात वाढ; शेतकऱ्यांचा भर साठवणूक केलेल्या सोयाबीन विक्रीवर!
- हवेलीत छत्रपती संभाजी राजेंचे स्मारक उभारणार; अजित पवारांची घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
