मुंबई: वर्ष 2022-23 वर्षाचा राज्याचा अर्थसंकल्प राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधीमंडळात सादर केला. शेतकऱ्यांना व सर्वसामान्य लोकांना आर्थिक दिलासा मिळेल, अशा घोषणा आज विधिमंडळात केल्या गेल्या. यामधील 10 महत्वाच्या घोषणा पाहूया..
बजेटमधील दहा महत्वाच्या घोषणा
१) महिला शेतकऱ्यांसाठी कृषी योजनांमध्ये राखीव असलेली 30 टक्केची तरतूद आता वाढवून 50 टक्के केलेली आहे. कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रूपये प्रोत्साहनपर देणार
२) हिंगोली, वर्धा, यवतमाळ, बुलडाणा, सांगली, सातारा, कोल्हापूर, सिंधुदूर्ग, भंडारा, जळगाव, अहमदनगर, धुळे, सोलापूर, रत्नागिरी, औरंगाबाद आणि रायगड येथे प्रत्येकी 100 खाटांचे स्त्री रोग रुग्णालय स्थापन करण्यात येतील
३) जलसंपदा विभागासाठी 13252 कोटींच्या निधीची तरतूद जाहीर
४) आरोग्य विभागासाठी 11 हजार कोटींच्या निधीची भरीव तरतूद कर्करोग व्हॅनसाठी करणार 8 कोटींची तरतूद
५) तृतीय पंथीयांना आता स्वतंत्र ओळखपत्र आणि रेशन कार्ड दिले जाणार
६) मागासवर्ग समर्पित आयोग स्थापन करणार
७) आंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना मोबाईल सेवा उपलब्ध करून देणार
८) मुंबई प्रमाणे राज्यात इतर ठिकाणी एसआरएसाठी 100 कोटी रुपयांचा निधी
९) 15 हजार 773 कोटी रुपये सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्ते बांधण्यासाठी तर इमारत बांधण्यासाठी 1 हजार कोटी
१०) एसटी महामंडळ 3 हजार नवीन बस देणार
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

