Share

रणजी ट्रॉफी : अजिंक्य रहाणे इज बॅक..! पहिल्याच सामन्यात ठोकलं शानदार शतक

Published On: 

मुंबई: भारतीय कसोटी क्रिकेट संघात खराब फॉर्मशी झगडत असलेल्या अजिंक्य रहाणेसाठी रणजी ट्रॉफी फॉर्म परत मिळवण्यासाठी एक चांगली संधी मिळाली आहे. मुंबई संघाकडून खेळताना अजिंक्य रहाणेने शानदार शतक झळकावले आहे.

गतविजेता सौराष्ट्र संघासोबत पहिल्या सामन्यात अजिंक्य रहाणेने चांगली खेळी केली आहे. युवा कर्णधार पृथ्वी शॉ याच्या कर्णधारपदात मुंबई संघ सौराष्ट्र विरुद्ध खेळण्यास उतरली. नाणेफेक जिंकत मुंबईने आधी फलंदाजी करायचा निर्णय घेतला. मुंबईची सलामीवीर अपयशी ठरल्यानंतर अजिंक्य रहाणे आणि सरफराजने मुंबईची खेळी सांभाळली आहे. अजिंक्य रहाणेने २१२ चेंडूत १०० धावा केल्या आहेत. ज्यात १४ चौकार आणि २ षटकारांचा समावेश आहे.

अजिंक्य रहाणेवर खराब कामगिरीमुळे बरीच टीका झाली होती. रहाणे आणि पुजारासाठी रणजी ट्रॉफीतील प्रदर्शन भारताच्या आगामी श्रीलंकेच्या दौऱ्यासाठी निवडीसाठी प्रमुख ठरणार आहे. अजिंक्य रहाणेने मिळालेल्या संधीचे सोने करत पहिल्याच रणजी सामन्यात आपल्या प्रतिभेचे प्रदर्शन केले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!