Share

IPL 2022: ‘ये बंधन तो…’ चेन्नईतून आरसीबीमध्ये गेलेल्या डु प्लेसीससाठी रैनाचा खास मेसेज; म्हणाला…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आयपीएल स्पर्धा सुरु होण्याआधी आरसीबीने फाफ डू प्लेसिसला कर्णधार म्हणून घोषित केले आहे. चेन्नईसोबत अनेक वर्ष खेळल्यानंतर आरसीबीने त्याला ७ कोटीत खरेदी केले होते. चेन्नईने या ऑक्शनमध्ये अनेक जुने खेळाडू रिलीज केले आहेत. ज्यामध्ये सुरेश रैनाचाही समावेश होता. बरेच वर्ष एकत्र खेळल्यानंतर फाफला कर्णधार झाल्याबद्दल रैनाने कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत.

फाफ डू प्लेसिस (faf du plessis) आणि सुरेश रैना (suresh raina)  गेल्या वर्षी सीएसकेचा भाग होते, या दोन्ही खेळाडूंना चेन्नईने या वर्षासाठी सोडले होते. आयपीएलच्या ऑक्शनमध्ये सुरेश रैना विकला गेला नाही, तर फाफला बँगलोरने खरेदी करत कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली. अलीकडेच,फाफने आगामी आयपीएल हंगामाच्या तयारीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे, ज्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले आहे की “अजून एका आयपीएल हंगामासाठी तयारी करण्याची संधी मिळाल्याबद्दल खूप आभारी आहे.” यावर रैनाने लिहले ” खूप शुभेच्छा कर्णधार, चांगला खेळ मित्रा”

रैनाच्या खास कमेंटला उत्तर देताना फाफने रिप्लायमध्ये आभार मानले आहेत.तसेच ऋतुराज गायकवाडनेही फाफसाठी कमेंट केली. मिस्टर आयपीएल म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुरेश रैनाने या स्पर्धेचा भाग न घेण्याची ही दुसरी वेळ आहे. वैयक्तिक कारणांमुळे त्याने २०२० मध्ये लीगमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला होता. तो यावेळी अनसोल्ड राहिल्याने स्पर्धेचा भाग नसणार आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!