विनोद पाटलांचे शिवजयंतीनिमित्त भव्य दुचाकी वाहन रॅलीला येण्याचे आवाहन

औरंगाबाद: शहरातील क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण शुक्रवारी होणार आहे. मात्र अनावरणाची वेळ मध्यरात्री १२ वाजताची ठेवण्यात आली होती. त्यामुळे रात्री १२ वाजेनंतर ढोलताशे व इतर ध्वनिक्षेपकांचा वापर करण्यावर बंदी असल्याने शिवप्रेमींनी नाराजी जाहीर करत अनावरणाची वेळ बदलण्याची मागणी केली होती. तर दुसरीकडे काल रात्री शिवजयंती शुभेच्छांचे बॅनर महापालिकेकडून काढण्यात आले. त्यामुळे मनसेने आक्रमक भूमिका घेत संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली. या वादावर तोडगा म्हणून महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडे यांनी उद्घाटन आता १२ ऐवजी १० वाजता होणार असल्याचे म्हटले आहे. मात्र आता हा वाद अजूनच चिघळण्याची शक्यता आहे.

कारण जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचे माजी अध्यक्ष विनोद पाटील यांनी आता थेट शासनाच्या नियमांना केराची टोपली दाखवली आहे. दुचाकी वाहन रॅलीला बंदी असताना विनोद पाटील (Vinod patil)यांनी “शिवजयंतीनिमित्त भव्य दुचाकी वाहन रॅली! शहरातील सर्वधर्मीय शिवप्रेमी बांधवांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित रहावे.”, असे आवाहन करणारी फेसबुक पोस्ट केली आहे.

https://www.facebook.com/vnpatilofficial/photos/a.1726117047637769/3110245945891532/

त्यामुळे शहरातील पुतळा उद्घाटन वाद अजूनच चिघळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुसरीकडे आजच महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन आता १२ ऐवजी १० वाजता होणार असल्याचे म्हटले आहे. तसेच या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेत्यांना निमंत्रित केले जाणार आहे. तर बॅनरमुळे झालेल्या वादावर तोडगा म्हणून बॅनर लावण्यासाठी महापालिका शिवप्रेमींना जागा उपलब्ध करून देणार आहे. मात्र आता विनोद पाटील यांनी फेसबुक पोस्टवरून थेट शासनाच्या नियमांनाच आव्हान दिले आहे.

महत्वाच्या बातम्या: