Share

भारतीय संघाला वर्ल्ड कप जिंकून दिल्यानंतर ‘या’ खेळाडूची रणजी ट्रॉफीत धमाकेदार कामगिरी

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : यश धुलच्या फलंदाजीची सर्वत्र चर्चा होत आहे. भारताला अंडर-१९ विश्वचषक जिंकून देणारा कर्णधार यश धुल रणजी ट्रॉफीमध्ये आश्चर्यकारक कामगिरी करत आहे. पदार्पणाच्या सामन्याच्या दोन्ही डावात या खेळाडूने शतक झळकावले आहे. त्याने खेळलेल्या तिन्ही रणजी सामन्यात तीन शतके झळकावली आहेत. पदार्पणाच्या सामन्याच्या दोन्ही डावात शतक झळकावणाऱ्या धुलने छत्तीसगडविरुद्ध शानदार द्विशतक ठोकले .

यश धुलने (Yash dhull) दिल्लीकडून रणजी ट्रॉफीमध्ये पदार्पण केले. ज्यामध्ये त्याने शानदार फलंदाजी करताना सर्वांची मने जिंकली आहेत. प्रथमश्रेणी कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या यशने पहिल्या सामन्यात अवघ्या १५० चेंडूत ११३ धावा केल्या.दुसऱ्या डावातही धुलने नाबाद ११३ धावा खेळी केली. धुलने आतापर्यंत ६ सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने आपल्या बॅटने ४७९ धावा केल्या आहेत. यश ज्या पद्धतीने धावा करत आहेत ते बघून त्याला भविष्यातील विराट कोहली (virat kohli) म्हणून बघितले जात आहे.

ज्या प्रकारची फलंदाजी यश धुलने अंडर-१९ वर्ल्डकप आणि रणजी टॉफीमध्ये केली आहे, ते लक्षात घेता तो आगामी आयपीएल स्पर्धेत आणखी चमकू शकतो. यशला दिल्ली कॅपिटल्स (delhi capitals) संघाने मेगा ऑक्शनमध्ये ५० लाख रुपयांनी आपल्या संघात घेतले आहे. स्पर्धेत दिल्ली कॅपिटल्सच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये यशला जागा मिळाली तर तो धावा करण्यात कोणतीही कसर सोडणार नाही असे दिसत आहे. आयपीएल हे आपली क्षमता दाखवण्यासाठी खूप मोठे व्यासपीठ आहे. यशने रणजी मध्ये त्याची क्षमता दाखवली आहे आता केवळ त्याला या मोठ्या स्पर्धेत एका संधीची अपेक्षा असेल.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!