काँग्रेस नेत्यांचे शिष्टमंडळ घेणार मुख्यमंत्र्यांची भेट; बाळासाहेब थोरात म्हणाले, “एका पक्षाचं सरकार असलं तरी…”

मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय नेत्यांमध्ये विविध मुद्द्यांवरून आरोप-प्रत्यारोपांची मालिका रंगलेली बघायला मिळत आहे. असे असतांनाच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षपदासाठीची निवडणूक अर्थसंकल्पीय अधिवेशनच्या पहिल्याच आठवड्यात होणार असल्याचे संकेत दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांचे शिष्टमंडळ आज संध्याकाळी ५ वाजेच्या सुमारास मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची (Uddhav Thackeray) भेट घेणार आहे. दरम्यान, या बैठकीसंदर्भात महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

यासंदर्भात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असतांना बाळासाहेब थोरात म्हणाले की,‘एका पक्षाचे सरकार असले तरीदेखील अनेक प्रश्न निर्माण होतात आणि मुख्यमंत्र्यांना ते सोडवावे लागतात. आज तीन पक्षांचे सरकार असताना काही प्रश्न नक्कीच आहेत. ते आम्ही आग्रहाने मांडून सोडवून घेणार आहोत’, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.

दरम्यान, काँग्रेससोबत दुजाभाव नसून त्यांचे जे काही प्रश्न आहेत, ते मान्य करतो. निधीच्या बाबतीतही अनेक प्रश्न असून आज ते सोडवले जातील, असेही बाळासाहेब थोरात यांनी यावेळी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या: