९ वर्षानंतर श्रीशांतला मिळाली पहिली विकेट!

मुंबई: आयपीएलमध्ये अनसोल्ड राहिल्यानंतर श्रीशांत पुन्हा मैदानावर उतरला आहे. आजपासून रणजी ट्रॉफीची सुरुवात झाली. ज्यात श्रीशांत केरळ संघाकडून खेळत आहे. आयपीएल फिक्सिंग प्रकरणी दोषी आढळल्यानंतर त्याला सर्व प्रकारच्या क्रिकेट मधून बॅन करण्यात आले होते. आता मात्र तो परत आला आहे. आणि रणजी ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात त्याला ९ वर्षांनी पहिली विकेट मिळाली आहे.

श्रीशांतवरील २०१३ मध्ये दोषी आढळल्यानंतरचा बॅन सुप्रीम कोटने २०१९ मध्ये हटवला होता. त्यानंतर श्रीशांतने पुन्हा शून्यातून सुरुवात केली आहे. त्याने केरळ संघासोबत प्रॅक्टिस सुरू केली. तो केरळकडून रणजी सामने खेळत आहे. मेघालय विरुद्धच्या पहिल्या सामन्याच्या पहिल्या इनींगमध्ये श्रीशांतने ९ वर्षाच्या मोठ्या कालखंडानंतर विकेट घेतली आहे. श्रीशांतने आर्यन बोरा आणि चॅन्गक्म संगमा यांना १ आणि ० धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले.

एस श्रीशांत ९ वर्षानंतर पहिल्यांदाच क्रिकेट खेळताना दिसत आहे. ज्यात तो अप्रतिम गोलंदाजी करत आहे. श्रीशांत बॅन उठल्यानंतर पूर्णवेळ क्रिकेटमध्ये पुनरागमन करण्यासाठी प्रॅक्टिस करत आहे. रणजी ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात दोन विकेट घेत त्याने पुनरागमनाची सुरुवात केली आहे.

महत्वाच्या बातम्या