मुंबई: कोलकाता नाईट रायडर्स IPL 2022 साठी इंग्लंडचा फलंदाज अॅलेक्स हेल्सच्या जागी अॅरॉन फिंचला संघात घेतले आहे. हेल्सने बबलमुळे स्पर्धेतून माघार घेण्याचे ठरवले. त्यानंतर मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिलेल्या ऍरॉन फिंचची (Aaron finch) कोलकात्यात वर्णी लागली आहे. ८७ आयपीएल खेळ खेळलेला आणि २००० हून अधिक आयपीएल धावा करणारा फिंच केकेआरमध्ये १.५ कोटी रुपयांच्या किमतीत सामील झाला आहे.
अॅलेक्स हेल्सने (Alex Hales) ट्विटरवर पोस्ट लिहून आपण आयपीएलमधून माघार घेत असल्याचे सांगितले आहे. तो म्हणाला “आगामी आयपीएलमधून माघार घेण्याचा मी अत्यंत कठीण निर्णय घेतला आहे हे जाहीर करताना मला दुःख होत आहे. मागील चार महिने घराबाहेर बायो बबलमध्ये घालवल्यामुळे आणि ऑस्ट्रेलियात स्वतःची कोविड चाचणी पॉझिटिव्ह आल्याने, जरी मी सुरक्षित वातावरणात दुसर्या विस्तारित कालावधीसाठी स्वत: ला वचनबद्ध करू शकतो मला तसे वाटत नाही,” हेल्स यांनी ट्विटरवर दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
???? Aaron Finch joins KKR as a replacement for Alex Hales.
Welcome to the #GalaxyOfKnights, @AaronFinch5! ????#KKR #KKRHaiTaiyaar #IPL2022 pic.twitter.com/3HnSyKogV2
— KolkataKnightRiders (@KKRiders) March 11, 2022
— Alex Hales (@AlexHales1) March 11, 2022
“सध्याच्या बबल थकवामुळे मी माझ्याकडून अपेक्षित स्तरावर कामगिरी करू शकलो नाही तर ते संघासाठी किंवा माझ्यासाठी योग्य ठरणार नाही. मला माझ्या सर्वोत्तम संधींपैकी एक नाकारावी लागली आहे. गेल्या दोन वर्षांच्या बबल आयुष्यामुळे माझ्या मानसिक आरोग्यावर परिणाम झाला आहे. मी आता विश्रांतीसाठी आणि उन्हाळ्यापूर्वी रिचार्ज करण्यासाठी थोडा वेळ घेईन. ऑक्शन दरम्यान माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल मी केकेआरचे आभार मानू इच्छितो. मी बाझ (मॅक्युलम), श्रेयस आणि संघाला स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो आणि भविष्यात कधीतरी नाईट रायडर्सच्या चाहत्यांना भेटण्याची आशा करतो,” असे हेल्सने लिहले आहे.
महत्वाच्या बातम्या
- ‘राधे श्यामने’ रीलीझ पूर्वीच जमवला २०० कोटींचा गल्ला…!
- अर्थसंकल्पात कृषी विभागासह ‘या’ १४ विभागांना निधी जाहीर
- ‘भाजपची कोणतीही लाट नाही’ – अमोल मिटकरी
- अभिषेकने वडील ‘अमिताभ बच्चन’ यांच्याबद्दल अस काय सांगितले की…
- ‘समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा अर्थसंकल्प’ – एकनाथ शिंदे
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

