“केंद्रातील सत्तेची गरमी दाखवत पोलिसांना चावा घेण्याचे काम भाजपने केलं”, नाना पटोलेंचा हल्लाबोल

मुंबई : १४ फेब्रुवारी रोजी कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis)यांच्या ‘सागर’ बंगल्यावर आंदोलन छेडले होते. (Congress agitation) मात्र पोलिसांनी त्यांना त्यांच्या घरासमोरील गेटवरच अडवले. तर दुसरीकडे भाजपकडूनही रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. नंतर मात्र नाना पटोले यांनी आंदोलन मागे घेण्याची भूमिका घेतली. या सर्व प्रकरणानंतर भाजप नेत्यांकडून पटोलेंवर टीकास्त्रांचा वर्षाव करण्यात आला. दरम्यान, आज(१७ फेब्रु.)पत्रकार परिषदेत बोलत असतांना नाना पटोलेंनी भाजपवर निशाणा साधत टीका केली. तसेच केंद्रातील सत्तेची गरमी दाखवत पोलिसांना चावा घेण्याचे काम भाजपने केलं, असेही पटोले म्हणाले.

१४ फेब्रुवारी रोजी झालेल्या प्रकरणासंदर्भात विचारण्यात आले असता नाना पटोले म्हणाले की,‘आम्ही हे आंदोलन लाखो लोकांना नेऊन करू शकलो असतो. परंतु, लोकांची गैरसोय होऊ नये याची काळजी घेणे आमचे कर्तव्य आहे. भाजपने केलेल्या पापाला विरोध करण्यासाठी आम्ही जे आंदोलन केलं होत. त्यात आपण बघितलेच असेल की भाजपने आपल्या काही लोकांना गुंडागर्दी करण्यासाठी पैसे देऊन रस्त्यावर उतरवलं होत’, असे पटोले म्हणाले.

दरम्यान, पुढे ते म्हणाले की,‘आम्ही तिथे लाखो लोक घेऊन जाणार नव्हतो पण भाजपने केंद्रातील सत्तेची गरमी कशी दाखवायची हा प्रयत्न केला. तसेच मुंबईकरांना अडचणीत आणण्याचे काम केलं. तसेच जर पोलिसांनी अडवले तर त्याला चावा घेण्याचे पापही भाजपने केले. या पद्धतीच्या कृत्याला आम्ही समर्थन करत नाही आणि त्यापध्दतीचे आंदोलन करायची आमची भूमिका नाही. त्यामुळे या आंदोलनाला आम्ही वेगळ्या दिशेने घेऊन जात आहोत’, असेही पटोले यांनी यावेळी सांगितले.

महत्वाच्या बातम्या: