हिजाब वादावरून साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त वक्तव्य; म्हणाल्या…

भोपाळ : कर्नाटक राज्यातील उडपी जिल्ह्यातील एका शाळेत विद्यार्थिनींनी हिजाब घालून प्रवेश करायचा प्रयत्न केला. हिजाब घालून तुम्ही शाळेत प्रवेश करू शकत नाही, शाळेत यायचे असेल तर शाळेने ठरवलेलाच गणवेश परिधान करावा लागेल असं म्हणत धार्मिक पेहराव असणारा हिजाब घालून आलेल्या मुलींना शाळेच्या प्राचार्यांनी प्रवेश नाकारला. यावर देशभरात अनेक वाद प्रतिवाद झाले.

त्यातच आज भारतीय जनता पक्षाच्या भोपाळच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांनी या हिजाब वादावर वादग्रस्त वक्तव्य केले आहे. हिजाब वादावर बोलताना साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर म्हणाल्या कि, ” भारतात हिजाब घालण्याची गरजच नाही. मुस्लिम महिलांनी हिजाब घालायचा असेल तर तो मदरशांमध्ये जाताना हिजाब घालावा. मुस्लिम महिलांनी शाळा-कॉलेजमध्ये जाताना हिजाब घालून जाऊ नये त्यांना हिजाब घालायचाच असेल तर मदरशांमध्ये जाताना किंवा घरातच हिजाब घालावा कारण मुस्लिम महिलांना बाहेरच्या जगापेक्षा त्यांच्या घरातच जास्त धोका असतो म्हणून त्यांनी घरातच हिजाब घालावा.

मुस्लिम महिला आपला चेहरा लपवण्यासाठी हिजाब घालतात त्यांना चेहरा लपवायचा असेल तर तो घरीच हिजाब घालून चेहरा लपवावा कारण मुस्लिम महिलांना घरातीलच काका, मामा, मामाच्या मुलांकडून धोका असतो. बुरखा घालायचा असेल तर तो घरीच घालावा सार्वजनिक आयुष्यात किंवा शैक्षणिक संस्थेत जाताना हिजाब किंवा बुरखा घालू नये असेही साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर आज म्हणाल्या.

महत्वाच्या बातम्या :