मुंबई: मेगा ऑक्शन संपल्यापासून आरसीबीचा कर्णधार कोण असेल याची चर्चा क्रिकेट क्षेत्रात सुरु होती. आता या प्रश्नाचे उत्तर मिळाले आहे. रॉयल चॅलेंजर्स बँगलोरने IPL 2022 च्या आधी फॅफ डू प्लेसिसची कर्णधार म्हणून नियुक्ती केली आहे. गेल्या हंगामात विराट कोहलीने IPL 2021 च्या शेवटी कर्णधारपद सोडणार असल्याची घोषणा केली. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज फाफ डू प्लेसिसला RCB ने मेगा ऑक्शनमध्ये ७ कोटी रुपयात खरेदी केले होते.
आरसीबीचा कर्णधार म्हणून नियुक्ती झाल्यानंतर आनंद व्यक्त करताना, फाफ डू प्लेसिस (Faf Du plessis) म्हणाला, “आरसीबीसारख्या फ्रँचायझीचा कर्णधार होण्याची संधी खूप मोठी आहे आणि ही भूमिका स्वीकारताना मला आनंद होत आहे. मागील वर्षांमध्ये संघाला मिळालेल्या यशासोबतच आम्ही पुढची वाटचाल करू. मला ही भूमिका सोपवल्याबद्दल मी आरसीबी व्यवस्थापन आणि प्रशिक्षक संघाचे आभार मानू इच्छितो आणि या वेळी अपेक्षित निकालासह यशस्वी हंगाम सुनिश्चित करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करेन.”
RCB टीम मॅनेजमेंटकडे कर्णधारपदासाठी ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल, भारताचा दिनेश कार्तिक असे तीन पर्याय होते. कारण विराट कोहलीला पुन्हा कर्णधारपद देण्यास डॅनियल विकटोरीने आधीच नकार स्पष्ट केला होता. चेन्नईचा सुपर स्टार असलेला फाफ आता बँगलोर संघाची धुरा सांभाळणार आहे. फाफकडे दक्षिण आफ्रिकेच्या यशस्वी नेतृत्वाचा अनुभव आहे. ज्यामुळे आता आरसीबीला फाफ पहिली ट्रॉफी जिंकून देईल अशी आशा आहे.
महत्वाच्या बातम्या
- मुंबई पोलीस जाणार फडणवीसांच्या घरी; कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी निर्णय
- काजल अग्रवाल लवकरच होणार आई; सोशल मीडियावर शेअर केले ग्लॅमरस फोटो
- ‘पुण्यात पालकांना मारहाणीचा प्रकार अयोग्य’ – नीलम गोऱ्हे
- Drone Farming: उस्मानाबाद जिल्ह्यातील 8 तालुक्यात प्रत्येकी 1 ड्रोन देण्यात येणार!
- मलायका अरोराचा फ्रॉकमधला स्टनिंग लूक पाहून चाहते झाले प्रभावित, म्हणाले…
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

