Share

नेपाळच्या पबमधील नाईटपार्टीत राहुल गांधी? भाजपची टीका!

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली :  काँग्रेसचे नेते राहुल गांधी काल सोमवारी नेपाळला गेले आहेत. राहुल गांधींचा हा खाजगी दौरा आहे. एका लग्न समारंभासाठी राहुल गांधी नेपाळला गेले असल्याचे सांगितले जात आहे. काठमांडू या नेपाळच्या राजधानीच्या शहरात मॅरिएट हॉटेल मध्ये ते थांबले आहेत. याच दरम्यान आता राहुल गांधी यांचा एका प्रसिद्ध पबमधील पार्टीतला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ नेपाळमधील ‘लॉर्ड ऑफ द ड्रिंक्स नेपाळ’ मधला असल्याचं सांगितले जात आहे.

राहुल गांधींचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजप आता या मुद्द्यावरून अधिक आक्रमक झाली आहे. भाजप नेत्यांनी हा व्हिडिओ ट्विट करत काँग्रेसवर हल्ला चढवला आहे. दरम्यान या व्हिडिओवर काँग्रेस किंवा राहुल गांधींकडून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही. मात्र राहुल गांधींच्या या व्हिडिओवर काँग्रेस आणि भाजप मध्ये जोरदार घमासान होण्याची शक्यता आहे. जोरदार राजकारण रंगण्याची चिन्हे दिसत आहेत.

भाजप नेते कपिल मिश्रा आणि अमित मालवीय यांनी हा विडिओ ट्विट केला आहे. भाजप प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी या प्रकरणावर काँग्रेसला सवाल केला आहे. “राहुल गांधी काय करत आहेत हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. राजस्थानच्या जोधपूर मध्ये हिंसा होत आहे. तिथे काँग्रेसचे सरकार आहे. राजस्थान जळत आहे. यावर चिंता व्यक्त करण्याऐवजी राहुल गांधी नेपाळला गेले आहेत. नाईटक्लब पार्टीत दिसत आहेत. भारतातील समस्या जाणून घेण्यासाठी त्यांना इथे असायला हवं होतं,” असे पुनावाला म्हणाले.

केंद्रीय मंत्री किरेन रिजेजू यांनीही राहुल गांधींचं हा व्हिडिओ ट्विट केला आहे. राहुल गांधींच्या व्हेकेशन, पार्टी, हॉलिडे, प्लेझर ट्रिप, प्रायव्हेट फॉरेन व्हिजिट इत्यादी गोष्टी आता देशाला नव्या नाहीत, असे ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!