🕒 1 min read
मुंबई : आयपीएल २०२२ (IPL 2022)च्या ४७व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने राजस्थान रॉयल्सला (KKR vs RR) मात दिली. मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात कोलकात्याच्या फलंदाजीदरम्यान एक रंजक घटना घडली, जेव्हा राजस्थानच्या क्षेत्ररक्षकाने चुकून चेंडू विकेटवर फेकण्याऐवजी आपल्याच गोलंदाजाला मारला. हा चेंडू गोलंदाजाच्या बुटावर आदळला नसता तर बोल्टला गंभीर दुखापत झाली असती. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
ही घटना कोलकाता फलंदाजीदरम्यान तिसऱ्या षटकात घडली. राजस्थानकडून डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट हे षटक टाकत होता. केकेआरचा फलंदाज बाबा इंद्रजीथने मिड ऑनच्या दिशेने हा चेंडू खेळला आणि धाव घेतली. या भागात क्षेत्ररक्षण करताना, प्रसिध कृष्णाने चेंडू पटकन पकडला आणि फलंदाजाला धावबाद करण्यासाठी यष्टीरक्षकाकडे जोरदार थ्रो फेकला. पण चेंडू विकेटवर आदळण्याऐवजी मध्यभागी उभा असलेला सहकारी खेळाडू ट्रेंट बोल्टच्या बुटांवर आदळला. मात्र, तोपर्यंत बाबा इंद्रजीथ आणि आरोन फिंचने एक धाव घेतली होती.
— Bleh (@rishabh2209420) May 2, 2022
बोल्टने या थ्रोमधून स्वत:ला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण फेक इतका वेगवान होता की त्याला तसा वेळ मिळाला नाही आणि चेंडू थेट त्याच्या बुटावर आदळला आणि तो जमिनीवर पडला. या घटनेनंतर बोल्टला आपले हसू आवरता आले नाही.
असा रंगला सामना…
आयपीएल २०२२ (IPL 2022) मध्ये कोलकाताने पाच पराभवानंतर विजय नोंदवला आहे. लीगच्या ४७व्या सामन्यात कोलकाता नाइट रायडर्सने राजस्थान रॉयल्सला (KKR vs RR) ७ गड्यांनी मात दिली. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात कोलकाताचा कप्तान श्रेयस अय्यरने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. संजू सॅमसनच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर राजस्थानने कोलकाताला १५३ धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात रिंकू सिंग आणि नितीश राणा यांच्या भागीदारीमुळे कोलकाताने १९.१ षटकात विजय मिळवला.
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

