🕒 1 min read
सांगली : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विरोधात वॉरंट जारी करण्यात आलं आहे. ६ एप्रिल रोजी हे अटक वॉरंट जारी करण्यात आलं होतं. मात्र अद्यापही त्यावर कारवाई का करण्यात आली नाही? असा प्रश्न आता न्यायालयाने पोलिसांसमोर उपस्थित केला आहे. सांगली जिल्ह्यातलं हे प्रकरण आहे. सांगली जिल्ह्यातल्या शिराळा कोर्टाकडून राज ठाकरेंना अटक करण्याबाबत वॉरंट जारी करण्यात आलं होतं. २८ एप्रिल २०२२ रोजी जारी करण्यात आलेलं हे पत्र आता समोर आलं आहे.
राज ठाकरेंवर १४३, १०९, ११७ अशी कलमं लावण्यात आली आहेत. २००८ सालच्या एका प्रकरणात राज ठाकरे यांच्या विरोधात हे अटक वॉरंट जारी करण्यात आलेलं आहे. यातली विशेष बाब म्हणजे राज ठाकरे यांच्या विरोधात जारी करण्यात आलेलं हे वॉरंट अजामीनपात्र आहे. त्यामुळे राज ठाकरेंना या वॉरंटमुळे कोणत्याही प्रकारचा जामीन मिळण्याची शक्यता नाही. सांगली जिल्ह्यातल्या शिराळ्यातील न्यायदंडाधिकाऱ्याने हे अटक वॉरंट जारी केले आहे.
२००८ सालच्या प्रकरणात जारी करण्यात आलेल्या वॉरंटमध्ये राज ठाकरेंवर आता पर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. दहा वर्षांपेक्षा जुनं असलेल्या या प्रकरणात आता विशेष हवालदाराची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अनावश्यक गर्दी करण्यासोबतच, इतरही अनेक कायद्यांचा उल्लंघन केल्याचा आरोप राज ठाकरे यांच्यावर आहे.
महत्त्वाच्या बातम्या :


