Share

World Junior Weightlifting Championship : पुण्याच्या हर्षदा गरुडने ऐतिहासिक कामगिरी करत पटकावले सुवर्णपदक

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: पुण्याच्या हर्षदा गरुड (Harshada Garud) हिने जागतिक ज्युनियर वेटलिफ्टिंग स्पर्धेत (World Junior Weightlifting Championship) ऐतिहासिक कामगिरी केली आहे. या स्पर्धेत भारताला  पहिले सुवर्णपदक हर्षदाने जिंकून दिले. आज अक्षय्यतृतीयेच्या मुहुर्तावरच तिनं सुवर्णपदक जिंकल्याने सर्वांच्याच माना उंचावल्या आहेत.

साधारण दोन महिन्यांपूर्वी अन्नातून विषबाधा झाल्यामुळे आजारी असलेल्या हर्षदाने या स्पर्धेत अव्वल येऊन आपली जिद्द दाखवली आहे. ग्रीसमधील हेराकिलॉन येथील स्पर्धेत हर्षदाने १५३ किलो वजन उचलून ४५ किलो गटात सुवर्णपदक जिंकले आहे. या स्पर्धेतील पहिल्याच प्रकारात तिने पदक जिंकून दिले. यापूर्वी भारताने कधीही जागतिक ज्युनियर स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले नव्हते.

दोन वर्षांपूर्वी अचंता शेऊलीने ७३ किलो गटात भारतासाठी रौप्यपदक जिंकले होते. आज अठरा वर्षीय हर्षदाने अन्य स्पर्धकांना किमान पाच किलोच्या फरकाने मागे टाकत ‘क्लीन अँड जर्क’मध्ये ८३ किलो वजन उचलले. दरम्यान याच स्पर्धेतील भारताच्या अंजली पटेलचे ब्राँझ थोडक्यात हुकले. तिने एकूण १४८ किलो (६७ आणि ८१ किलो) वजन उचलले. हर्षदाने केलेल्या या कामगिरीचे सर्वच स्तरातून कौतुक केले जात आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!