Share

“प्रत्येक निवडणुकीला सुपारी घेण्याची ‘मनसे’ची जुनी पद्धत”, शिवसेनेचा प्रहार

Published On: 

🕒 1 min read

रत्नागिरी : राज्यात सध्या भोंग्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १ मे रोजी औरंगाबाद येथे सभा घेत पुन्हा मशिंदीवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला. ३ तारखेला रमजान ईद आहे. मला त्यांच्या सणात विष कालवायचे नाही. पण ४ तारखेनंतर ऐकणार नाही, असा अल्टीमेटम त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. यावरच शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी प्रतिक्रिया देत मनसेवर निशाणा साधला आहे.

“राज ठाकरेंची करमणूक करण्याची ही पद्धत जुनी आहे. प्रत्येक निवडणुकीला सुपारी घेण्याची मनसेची जुनी पद्धत आहे. उद्धव ठाकरे यांच्याविषयीचा मनात द्वेष असल्यामुळे स्वतःचा भाऊ मुख्यमंत्रीपदावर बसलेला पहावत नसल्याने त्यांचा थयथयाट सुरु आहे. त्यांच्या दुष्ट आणि कपट नितीला भाजपची साथ आहे.”, असा आरोप विनायक राऊत यांनी केला आहे.

तसेच केवळ उद्धव ठाकरेंना त्रास देण्यासाठी हा प्रश्न उचलला जात असेल तर राज्यातील जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. असा इशाराही विनायक राऊत यांनी दिला आहे. ते आज रत्नागिरी येथे माध्यमांशी संवाद साधत होते.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!