Share

“स्वतःचा भाऊ मुख्यमंत्रीपदावर बसल्याचे पाहवत नसल्याने…”, विनायक राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

Published On: 

🕒 1 min read

रत्नागिरी : राज्यात सध्या भोंग्यावरून राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी १ मे रोजी औरंगाबाद येथे सभा घेत पुन्हा मशिंदीवरील भोंग्यांचा मुद्दा उपस्थित केला. ३ तारखेला रमजान ईद आहे. मला त्यांच्या सणात विष कालवायचे नाही. पण ४ तारखेनंतर ऐकणार नाही, असा अल्टीमेटम त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. यावर अनेक प्रतिक्रिया उमटत असताना शिवसेना खासदार विनायक राऊत (Vinayak Raut) यांनी स्वतःचा भाऊ मुख्यमंत्रीपदावर बसल्याचे पाहवत नसल्याने राज ठाकरेंचा थयथयाट सुरु असल्याचे म्हटले आहे. ते रत्नागिरी मध्ये माध्यमांशी संवाद साधत होते.

“भोंगा हा विषय मुद्दामहून मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना त्रास देण्यासाठी उकरला जात आहे. भोंग्याबाबत जर निर्णय घ्यायचा असेल तर केंद्र सराकराने समान कायदा करावा. देशपातळीवर अंमलबजावणी करावी. केवळ महाराष्ट्रात अतिक्रमण झाल्याचं दर्शवून मविआ सरकारला विशेष करून उद्धव ठाकरे साहेबांना त्रास द्यायचा या दुष्ट आणि कपट नितीने भाजपाची सुपारी घेऊन राज ठाकरेंनी केलेल हे नाट्य आहे.”, असे विनायक राऊत यांनी म्हटले आहे.

तसेच राज ठाकरेंची करमणूक करण्याची ही पद्धत जुनी आहे. प्रत्येक निवडणुकीला करमणुकीचे कार्यक्रम घेण्यासाठी कुणाची तरी सुपारी घ्यायची. उद्धव ठाकरे यांच्याविषयीचा मनात द्वेष असल्यामुळे स्वतःचा भाऊ मुख्यमंत्रीपदावर बसलेला पहावत नसल्याने त्यांचा थयथयाट सुरु आहे. त्यांच्या दुष्ट आणि कपट नितीला भाजपची साथ आहे.”, असा दावाही विनायक राऊत यांनी केला आहे.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!