उन्नाव उत्तरप्रदेश : सध्या देशात मशिदीवरील भोंगे आणि हनुमान चालीसा यावरून वाद सुरु आहे. अनेक राज्यात बुलडोजर कारवाई केली जात आहे. त्यावरूनही आता देशात बुलडोजर राजकारणाच्या नव्या अध्यायाला सुरुवात झाली असून दररोज नव्या वादाला तोंड फुटत आहे. तर महाराष्ट्रात अमरावतीचे खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती रवी राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मातोश्रीवर हनुमान चालीसा पठण करायला येऊ, असे आव्हान दिले होते. त्यानंतर दोन दिवस राज्यात भाजप आणि शिवसेना यांच्यात राडा दिसून येत आहे. कायदा सुव्यवस्था बिघडल्या प्रकरणी पोलिसांनी राणा दाम्पत्याला अटक केली आहे. याच दरम्यान आता देशातील वातावरण बिघडण्याची शक्यता निर्माण झाली असून उन्नाव उत्तरप्रदेश मधील भाजप खासदार साक्षी महाराज यांनी फेसबूकवर एक वादग्रस्त पोस्ट टाकली आहे. या पोस्ट मध्ये त्यांनी पोलिसांना भ्याड म्हंटले आहे. तर लोकांना त्यांच्या सुरक्षेचे उपायही सुचविले आहे.
आपल्या विधानामुळे अनेकदा अडचणीत आलेले भाजप खासदार साक्षी महाराज यांनी फेसबुकवर एक वादग्रस्त पोस्ट केली आहे. ते फेसबुक पोस्टमध्ये लिहतात, तुमच्या गल्लीत, तुमच्या शेजारी, घरात अचानक गर्दी झाली तर पळून जाण्याचे मार्ग काय? तुमच्याकडे मार्ग नसेल तर एक करा. काहीतरी करा. तुमच्याकडे कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या आणि बाण असले पाहिजेत असा सल्ला दिला. मुस्लीम वेशातील जमाव हत्यार घेऊन आहेत, असा एक फोटो पोस्ट केला आहे.
https://www.facebook.com/DrSakshiMaharaj/posts/2082322601939694
तसेच साक्षी महाराज यांनी पोलिसांचे भ्याड असे वर्णन केले. तसेच त्यांनी लिहिले की, जेव्हा जमाव तुमच्या घरी येईल, तेव्हा पोलीस कुठल्यातरी अंधार कोठडीत लपून बसतील. जेव्हा लोक जिहाद करून परत येतात, तेव्हा पोलीस त्यांना मारायला येतात. चौकशी समितीसमोर आल्याने, हे प्रकरण काही दिवसात संपेल. अशा पाहुण्यासाठी कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या आणि बाण घरात ठेवा.
महत्त्वाच्या बातम्या :


