Share

“आता जेलमध्ये बसून हनुमान चालीसा वाचा”; संजय राऊतांचा राणा दाम्पत्यावर घणाघात

Published On: 

मुंबई : आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर पोलिसांकडून लावण्यात आलेले राजद्रोहाचे कलम योग्यच असल्याचे वक्तव्य केले आहे. तसेच राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. हा न्यायालयाचा निर्णय आहे, सरकारचा नव्हे. महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे, प्रत्येक कारवाई ही कायद्यानेच होते. असेही संजय राऊत म्हणाले.

“भाजप दंगलसदृश परिस्थिती निर्माण करत आहे. महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आणण्याचा प्रयत्न भाजपकडून सुरु आहे. सदावर्ते प्रकरणातही हेच झाले. त्यावेळी शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाला. आता मातोश्रीवर हल्ला करण्याचा प्रयत्न होता. या सगळ्यामागे मोठे कारस्थान, षडयंत्र आहे. धर्माच्या नावाखाली राज्य उलथवण्याचा प्रयत्न झाल्यास राजद्रोहाचा खटला दाखल व्हायला हवा. भीमा-कोरेगाव प्रकरणातही भाजपने अनेक कवी आणि लेखकांविरोधात राजद्रोहाचे कलम वापरले. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी आता आम्हाला शहाणपण शिकवू नये”. असे संजय राऊत यांनी स्पष्ट म्हंटले आहे.

तुरुंगात बसून हनुमान चालीसा वाचा –

पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले, “आता ते तुरुंगात बसून हनुमान चालीसा वाचू शकतात. राणा दाम्पत्याला हनुमान चालीसा वाचण्याची इतकी हौस होती तर त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या घरी जावे, कोर्टात जावे किंवा एखादे सभागृह घेऊन हनुमान चालिसा वाचावी. महाराष्ट्रात हनुमान चालीसा वाचायला बंदी नाही. पण मातोश्रीत घुसून हनुमान चालीसा वाचण्याचा हक्क योग्य नाही. तुम्ही मातोश्रीत घुसलात तर आम्ही देखील घुसू”.

महत्वाच्या बातम्या –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!