पुणे : राज्यात गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या तणावाच्या परिस्थितीवरून राज्यात भाजपच्या काही नेत्यांकडून राष्ट्र्रपती राजवटीची मागणी केली जात आहे. विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचे नेते अनिल बोंडे यांनी राष्ट्र्रपती राजवटीची मागणी केली आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार का ? याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत. भाजप नेत्यांची राष्ट्र्रपती राजवटीची मागणी जोर धरत असतानाच आता देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठे विधान केले आहे. “राष्ट्र्रपती राजवटीची मागणी चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर यांनी केली असेल, मात्र राज्यातील परिस्थिती पाहून सर्वसामान्य जनतेच्या मनातही हीच भावना आहे, असे सांगतानाच भाजप हा लढणारा पक्ष आहे. त्यामुळे आम्ही अशी मागणी करणार नाही,” अशी सारवासारव देवेंद्र फडणवीस यांनी केली.
पुण्यात मिडियाशी संवाद साधताना त्यांनी हे विधान केलं आहे. किरीट सोमय्या हे झेड सुरक्षा असलेली व्यक्ती आहे. आपण पोलीस ठाण्यात येत असल्याचे त्यांनी पोलिसांना कळवले होते. तरीही त्यांच्यावर हल्ला होतो. याचा अर्थ पोलिसांचा या हल्ल्याला समर्थन आहे. किंवा पोलीस नाकाम झाले आहेत. पोलीस झेड सुरक्षाधारी व्यक्तीला संरक्षण देऊ शकत नसतील तर तिथे इतरांचं काय ? असं सवाल करतानाच पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे, असे फडणवीस म्हणाले. यासारखं झुंडशाहीचं राजकारण मी पाहिलं नव्हतं. पोलिसांना कळवून ही त्यांनी सोमय्यांना गुंडांच्या हवाली केलं. जीवे मारण्याचा प्रयत्न केला जातो, ही घटना दुर्दैवी आहे. आम्ही केंद्र सरकारला सांगणार आहोत. गृहविभागाच्या सचिवांना याबद्दल तक्रार करणार आहोत.
राणा दाम्पत्य हनुमान चाळीसा म्हणणार होते. हनुमान चाळीस महाराष्ट्रात नाहीतर काय पाकिस्तानात म्हणायची का? असा सवाल फडणवीस यांनी उपस्थित केला. एका महिलेला पोलीस कस्टडीत ठेवले, हे योग्य नाही, असेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

