मुंबई : युवा सेनेने रवी राणा आणि नवनीत राणा यांच्याविरोधात खार पोलीस ठाण्यात काल तक्रार नोंदविली होती. यानंतर पोलीस राणा यांच्या घरी दाखल झाले होते. यावेळी राणा यांनी वारंटची मागणी करत, हाय वोल्टेज ड्रामा केला. दरम्यान पोलीस आणि राणा यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. शेवटी पोलिसांनी राणा दाम्पत्याला त्यांच्या राहत्या घरातून ताब्यात घेत अटक केली.
या प्रकरणावरून आज राणा दाम्पत्य यांच्यावरील सुनावणी पूर्ण झाली आहे. एकीकडे राणा दाम्पत्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, तर दुसरीकडे सरकारी वकिलांकडून राणा दाम्पत्याच्या ७ दिवसांची पोलीस कोठडीची मागणी होत आहे. दरम्यान राणा दाम्पत्यानी जामिनासाठी अर्ज केला परंतु जामीन अर्जावर २९ एप्रिलला सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट सांगितले आहे. रवी राणांची रवानगी आर्थर रोड जेलमध्ये तर नवनीत राणांची रवानगी भायखळा जेलमध्ये होऊ शकते असा अंदाज वर्तविला जात आहे.
बॉम्बे पोलीस अॅक्ट सेक्शन ३५ –
हा बॉम्बे पोलीस अॅक्ट सेक्शन ३५ अंतर्गत मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये मुंबई पोलिसांच्या कारवाईत एखादी व्यक्ती अडथळा आणत असल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल होतो. राणा यांनी पोलीस चर्चेसाठी गेलेले असताना वॉरंटची मागणी केली. पोलिसांसोबत शाब्दिक बाचाबाची झाली. त्यानुसार ही कारवाई केल्याचं स्पष्ट झाले आहे. कालपासून या संपूर्ण प्रकरणात एकूण पाच गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यामुळे राणा दाम्पत्यांच्या अडचणीत वाढ होणार असल्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या –


