मुंबई : काऊंटी चॅम्पियनशिपमध्ये (county cricket) पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज आणि भारताचा जावई हसन अली (Hasan Ali) याची स्वप्नवत सुरुवात झाली आहे. अलीने आपल्या अचूक यॉर्करने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. हसन अली इंग्लंडमधील काऊंटी डिव्हिजन-१ सामन्यात लँकेशायरकडून खेळत आहे. ग्लॉस्टरशायरविरुद्धच्या सामन्याच्या तिसऱ्या दिवशी त्याने अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनसह नव्या चेंडूने गोलंदाजीची केली. यादरम्यान त्याने आपल्या अचूक यॉर्करने स्टम्प मोडला, ज्याची सर्वत्र चर्चा होत आहे.
हसन अलीने डावाच्या २५व्या षटकातील शेवटचा चेंडू यॉर्कर टाकला. यष्टीरक्षक फलंदाज जेम्स ब्रॅसी क्रीजवर होता. ग्लॉस्टरशायरच्या यष्टीरक्षकाने हसनचा हा यॉर्कर बचावात्मक पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न केला, पण त्यात तो यशस्वी होऊ शकला नाही. चेंडूचा वेग इतका वेगवान होता की मधल्या स्टम्पचे दोन तुकडे झाले. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
What a ball from Hasan Ali, middle stump is broken. pic.twitter.com/Ucd5ceHsDq
— Johns. (@CricCrazyJohns) April 23, 2022
सामन्यात हसन अलीने पहिल्या डावात १७ षटके टाकली. यादरम्यान त्याने ४७ धावा देत ६ षटके निर्धाव टाकली आणि एकूण ६ विकेट्स आपल्या नावावर केल्या. यावेळी हसन उत्कृष्ट लयीत दिसत आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यापासून त्याच्या फॉर्मबाबत चिंता होती. तो विकेटसाठी झगडताना दिसला, पण तो काऊंटीमध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, तो भविष्यात पाकिस्तानसाठी फायदेशीर ठरू शकतो.
Aah! The smiling Hasan Ali is back ???? pic.twitter.com/ZbGVYFslJJ
— Ibrahim Badees (@IbrahimBadees) April 23, 2022
महत्त्वाच्या बातम्या –
IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

