Share

IPL 2022 नंतरही असणार भरपूर क्रिकेट मनोरंजन..! BCCIनं केली ‘मोठी’ घोषणा; वाचा!

Published On: 

मुंबई : भारतीय नियामक क्रिकेट मंडळाने (BCCI) शनिवारी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील (India vs South Africa) जूनमध्ये होणार्‍या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील सामन्यांची ठिकाणे जाहीर केली आहेत. दिल्लीत ९ जूनपासून ही मालिका पाच वेगवेगळ्या ठिकाणी खेळवली जाणार आहे. या मालिकेतील उर्वरित सामने अनुक्रमे कटक, विशाखापट्टणम, राजकोट आणि बंगळुरू येथे खेळवले जातील. सध्या भारतात आयपीएल २०२२ (IPL 2022) स्पर्धा सुरू आहे.

भारताचे प्रमुख खेळाडू सध्या आयपीएल २०२२मध्ये खेळण्यात व्यस्त आहेत. त्याचबरोबर दक्षिण आफ्रिकेतील अनेक मोठे खेळाडू या स्पर्धेत वेगवेगळ्या संघांकडून खेळत आहेत. अशा स्थितीत २९ मे रोजी होणाऱ्या आयपीएल फायनलनंतर खेळाडूंना काही दिवसांचा ब्रेक मिळणार असून त्यांना पुन्हा मैदानात उतरावे लागणार आहे.

यापूर्वी, दक्षिण आफ्रिकेने २०१९ दौऱ्यावर भारताविरुद्ध तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळली होती, जी १-१अशी बरोबरीत संपली होती. मालिकेतील पहिला सामना रद्द करण्यात आला. अलीकडेच भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये पराभव झाला. अशा परिस्थितीत, प्रोटीज संघाचा आत्मविश्वास खूप उंचावला आहे.

सामने कधी आणि कुठे खेळवले जातील?

  • पहिला सामना: ९ जून, दिल्ली
  • दुसरा सामना: १२ जून, कटक
  • तिसरा सामना: १३ जून, विशाखापट्टणम
  • चौथा सामना: १७ जून, राजकोट
  • पाचवा सामना: १९ जून, बंगळुरू

ही मालिका आयपीएल २०२२ नंतर खेळवली जाणार आहे. अशा परिस्थितीत या मालिकेत स्पर्धेत चांगली कामगिरी करणाऱ्या अनेक खेळाडूंना संधी मिळू शकते. या खेळाडूंमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फिनिशर दिनेश कार्तिक आणि सनरायझर्स हैदराबादचा वेगवान गोलंदाज उमरान मलिक यांचे नाव आघाडीवर आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!