चंदीगड : पंजाब दौऱ्यात पंतप्रधानांच्या सुरक्षेत झालेल्या उल्लंघनाबाबत राज्याचे मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी पत्रकार परिषदे घेतली. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आज फिरोजपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरुन परतावे लागले याचे मला वाईट वाटते. आम्ही आमच्या पंतप्रधानांचा आदर करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींना रिसीव्ह करण्यासाठी मला आज भटिंडा येथे जायचे होते, पण माझ्यासोबत असलेले लोक कोरोना पॉझिटिव्ह आढळले, त्यामुळे मी आज पंतप्रधानांना रिसीव्ह करायला गेलो नाही कारण मी काही कोरोना पॉझिटिव्ह लोकांच्या संपर्कात होतो,” मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी यांनी स्पष्ट केले आहे.
“खराब हवामान आणि विरोधामुळे आम्ही त्यांना (पीएमओ) दौरा रद्द करण्यास सांगितले होते. तसेच नरेंद्र मोदी यांच्या ताफ्याला अचानक वळवल्याबद्दल आम्हाला कोणतीही माहिती नव्हती. पंतप्रधानांच्या दौऱ्यात सुरक्षेत कोणतीही त्रुटी आढळली नाही. मात्र सुरक्षेमध्ये काही त्रुटी आढळल्यास आम्ही चौकशी करू,” असे चरणजित सिंह चन्नी म्हणाले.
सीएम चन्नी म्हणाले, “गेल्या वर्षभरापासून शेतकरी शांततेने आंदोलन करत आहेत. मी शेतकऱ्यांवर लाठीचार्ज करू शकत नाही. आम्ही रात्रभर शेतकऱ्यांशी चर्चा केली, त्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले. आज अचानक फिरोजपूर जिल्ह्यात काही आंदोलक जमा झाले. पंतप्रधानांवर हल्ला झाला नाही, असा विचारही नव्हता. यापूर्वीही दिल्लीत शेतकरी आंदोलन झाले होते, त्यांची काही मागणी होती जी एका वर्षानंतर पूर्ण झाली. आजही शांततेने आंदोलन करण्यासाठी कोणी रस्त्यावर आले तर त्याला पंतप्रधानांच्या सुरक्षेशी जोडले जाऊ नये, राजकारण होता कामा नये.”
पंतप्रधान २० मिनिटे उड्डाणपुलावर अडकून होते
पंतप्रधान मोदी मंगळवारी पंजाबच्या दौऱ्यावर होते, जिथे ते फिरोजपूर येथे एका कार्यक्रमात अनेक विकास योजनांची पायाभरणी करणार होते आणि त्यानंतर एका सभेला संबोधित करणार होते. रस्त्याने जात असताना काही आंदोलकांनी त्याच्या पुढे रस्ता अडवला तेव्हा ‘सुरक्षेमध्ये गंभीर त्रुटी’ आली. यामुळे पंतप्रधान २० मिनिटे उड्डाणपुलावर अडकून पडले आणि नंतर त्यांच्या ताफ्याला परतावे लागले. या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत केंद्रीय गृहमंत्रालयाने पंजाब सरकारकडून या चुकीचा अहवाल मागवला असून याला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
- पुण्यात आजी-माजी आमदार भर कार्यक्रमातच भिडले
- …आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांचा फोन रश्मी ठाकरेंनी उचलला
- यश-नुसरत जहाँ यांचं नातं तुटण्यापूर्वीच दोघांचा खरा प्रवास झाला सुरू!
- पंजाबने भाजपच्या अहंकाराला आरसा दाखवला; काँग्रेसचे भाजपला प्रत्युत्तर
- ‘गद्दारी करणाऱ्या काँग्रेस सरकारचा खरा चेहरा समोर आला’; प्रविण दरेकरांची टीका


