🕒 1 min read
मुंबई : निखिल जैनपासून (Nikhil Jain) विभक्त होऊन मुलाला जन्म दिल्यापर्यंत अनेक गोष्टींमुळे खासदार आणि बंगालच्या अभिनेत्री नुसरत जहाँ (Nusrat jahan) चर्चेत राहिल्या आहेत. त्यानंतर आता नुकतंच नुसरत जहाँ यांनी बॉयफ्रेंड आणि अभिनेता यश दासगुप्तासोबतच्या(yash dasgupta) नात्याबद्दल एका रेडिओ शो दरम्यान खुलासा केला आहे.
दरम्यान नुसरत जहाँ यांनी नुकतंच एका रेडिओ शो ला हजेरी लावली. त्यावेळी त्यांनी सांगितले, एकेकाळी माझे आणि यशचे नाते हे तुटण्याच्या मार्गावर होते. मात्र मी अगदी फिल्मी पद्धतीने ते वाचवण्याचा प्रयत्न केला. काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियावर माझ्यावर इतके वैयक्तिक हल्ले झाले की मी त्याच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. “पण एके दिवशी यश माझ्या घराखाली आला आणि त्याने मला त्याच्या गाडीत बसायला सांगितले. त्यावेळेस आमच्यात काहीही चांगले चालले नव्हते. पण नंतर सर्व काही ठीक झाले. त्यानंतर मग आम्ही एकत्र राहण्याचा निर्णय घेतला आणि यानंतरच आम्हा दोघांचा खरा प्रवास सुरु झाला,” असे नुसरत जहाँ यांनी सांगितले.
https://www.instagram.com/p/CYV-wVxP-fh/?utm_source=ig_web_copy_link
या शोमध्ये नुसरत आणि यशच्या लव्ह स्टोरीबाबत विचारण्यात आल्यावर यशनं नुसरतला याचं उत्तर देण्यास सांगितलं. त्यानं तिला विचारलं, ‘हे सर्व कसं सुरू झालं?’ या प्रश्नाचं उत्तर देताना नुसरत म्हणाली, मी तुझ्यासोबत फरार झाले होते. असं म्हणणं अधिक चांगलं ठरेल. हो, मी तुझ्यासोबत फरार झाले होते.’ नुसरतनं या एपिसोडमध्ये बरेच खुलासे केले आहेत. नुसरत जहाँ आणि यश दासगुप्ता यांनी एकमेकांशी लग्न केलंय की नाही हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. पण त्यांच्या सोशल मीडिया पोस्टवरून तर त्या दोघांनी लग्न केलं आहे असं दिसून येतं. काही दिवसांपूर्वी नुसरतनं इन्स्टाग्रामवर एक केकचा फोटो शेअर केला होता. ज्यावर ‘पती आणि वडील’ असं लिहिलं होतं.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘सिंधुताई यांच्याशी खास नातं..’ म्हणत पडद्यावर सिंधुताई सपकाळ साकारणारी तेजस्विनी पंडित झाली भावूक
- विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर कोरोना पॉझिटिव्ह; ट्वीट करत दिली माहिती
- बाईकवर किस करणाऱ्या ‘त्या’ तरुणाला अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
- “नकली घोड्यावर बसणाऱ्या ‘मैने’ला पद्म पुरस्कार दिला जातो पण…”, रोहित पवारांचा कंगनाला अप्रत्यक्ष टोला
- “सध्याच्या महाराष्ट्राला कोणी वालीआहे का?”, सदाभाऊंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
