पुणे: जिल्ह्यातील जुन्नर पारीसारत आजी व माजी आमदारात चांगलाच शाब्दिक वाद पेटला होता. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अतुल बेनके आणि माजी आमदार शरद सोनवणे यांनी एकमेकांवर अरेरावी केल्याची घटना घडली आहे. त्यांच्यातील हा वाद श्रेय घेण्यावरून झाला असल्याचे समोर आले आहे. मुख्यमंत्री सडक योजनेतील कामाचे श्रेय घेण्यावरून हा वाद रंगला असल्याचे सांगितले जात आहे.
मुख्यमंत्र्यांच्या नावाने असणाऱ्या या योजनेला मात्र मुख्यमंत्र्यांनाच आमंत्रण नव्हते. तसेच राष्ट्रवादीच्या विद्यमान आमदार बेनके यांनी या कार्यक्रमाला शिवसेनेला डावलले आहे. हे पाहून माजी आमदार सोनवणे यांनी बेनकेंच्या आधी जाऊन उपस्थिती लावली. व कार्यक्रमादरम्यान ते दोघेही एकमेकांच्या जवळच बसले. त्याच वेळी सोनावणेंनी श्रेयवादाचा मुद्दा उपस्थित केला.
सोनवणे यांनी बेनकेंच्या हाताला स्पर्श करत जाब विचारला. त्यावरून बेनके अचानक संतांपून मला हात लावायचा नाही म्हणाले. त्यावर मी फक्त स्पर्श केला, तुम्हाला पटत नाही तर मग माझ्या बाजूला कशाला बसले, असं सोनवणे म्हणाले. या नंतर हे दोन्ही आमदार भर कार्यक्रमातच भिडले.
महत्वाच्या बातम्या:
- सारा अली खान मंदिर, मशीद सारख्या अध्यात्मिक ठिकाणी का जाते? ; जाणून घ्या कारण
- …आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांचा फोन रश्मी ठाकरेंनी उचलला
- यश-नुसरत जहाँ यांचं नातं तुटण्यापूर्वीच दोघांचा खरा प्रवास झाला सुरू!
- पंजाबने भाजपच्या अहंकाराला आरसा दाखवला; काँग्रेसचे भाजपला प्रत्युत्तर
- मनसेच्या नवनियुक्त जिल्हाध्यक्षांचे पहिले आंदोलन; मात्र माजी जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे गायब?

