Share

‘गद्दारी करणाऱ्या काँग्रेस सरकारचा खरा चेहरा समोर आला’; प्रविण दरेकरांची टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: कृषी कायदे रद्द केल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) पंजाबच्या दौऱ्यावर होते. बुधवारी फिरोजपूर येथून मोदींची रॅली होती. मात्र ऐनवेळी त्यांना ही रॅली रद्द करावी लागली आहे. सुरक्षेचे कारण देत ही रॅली रद्द करण्यात आली आहे. आंदोलकांनी रस्ता अडवून धरल्याने पंतप्रधान मोदींचा ताफा मध्येच थांबवण्यात आला. या प्रकरणावरून आता भाजपने पंजाब कॉंग्रेसवर जोरदार टीका करायला सुरुवात केली आहे.

या पार्श्वभूमीवर भाजप नेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. दरेकर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेबाबत पंजाब सरकारने दाखविलेला हलगर्जीपणा हा राजकीय निषेधाची खालची पातळी गाठणारा आहे, अशा शब्दात दरेकरांनी पंजाब सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच कॉंग्रेस अविचारी वृत्तीने वागत असल्याची टीका देखील प्रविण दरेकर यांनी केली आहे.

भाजप नेते प्रविण दरेकर यांनी ट्विटर अकाऊंटवरुन या सांदारभात नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस सरकार भाजपला इतके घाबरले आहे की ते आता पूर्णपणे अविचारी वृत्तीने वागत आहे. या प्रकाराबद्दल काँग्रेस सरकारने देशवासियांची माफी मागितली पाहिजे. तसेच आज पंजाबमध्ये जे काही घडले त्यामागे देशाच्या स्वाभिमानाशी गद्दारी करणाऱ्या काँग्रेस सरकारचा खरा चेहरा समोर आला आहे, असंही दरेकर म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!