Share

…आणि म्हणून देवेंद्र फडणवीसांचा फोन रश्मी ठाकरेंनी उचलला

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रकृती ठीक नसल्याने ते घरूनच काम पाहत आहेत तसेच हिवाळी अधिवेशनाला देखील ठाकरे उपस्थित नव्हते त्यामुळे विरोधी पक्षाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. यावरून उद्धव ठाकरे यांनी देखील विरोधकांना प्रत्युत्तर दिले आहे. या सर्व गोष्टींमुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापत आहे. मात्र अशातच माजी मुख्यमंत्री व भाजपचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वयक्तिक पातळीवर जाऊन देखील भाजप नेत्यांनी टीका केली आहे. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना मुख्यमंत्री पदावर बसवलं तरी त्या उत्तम पद्धतीने राज्य चलवतील, अशी टीका विरोधकांनी केली होती. या सगळ्यात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला. मात्र उद्धाव ठाकरेंनी फोन उचलला नाही. उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी तो फोन उचलला.

उद्धव ठाकरे यांच्या मानेचं नुकतच ऑपरेशन झाले आहे. त्यामुळे ते सध्या बाहेर कुठे येत नाहीयेत. याच कारणामुळे ते हिवाळी अधिवेशनाला देखील उपस्थित राहू शकले नाहीत. जेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी फोन केला होता तेव्हा उद्धव ठाकरे आराम करत होते आणि म्हणून त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी तो फोन उचलला. तेव्हा फडणवीस म्हणाले, या कठीण प्रसंगी आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे फडणवीस म्हणाले.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!