🕒 1 min read
मुंबई : आर्यन खान ड्रग्स प्रकरणानंतर चर्चेत असलेले एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची डिआरआयमध्ये बदली झाली आहे. त्यांचा एनसीबी कार्यकाळ संपल्याने त्यांची बदली करण्यात आली आहे. यापुर्वी समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते तथा राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आरोपांचा सपाटा लावला होता. आता यातच त्यांची डिआरआयमध्ये बदली करण्यात आली आहे. दरम्यान, नवाब मलिकांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. बदली झाली तरी लढाई थांबणार नसल्याचे मलिक म्हणाले.
“एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे हे त्यांच्या कार्यकाळात ज्याप्रकारे फर्जीवाडा करत होते, त्यातील अनेक प्रकरणे आम्ही जनतेसमोर आणली होती. त्याचबरोबर विविध लेखी तक्रारीही केल्या. तसेच वानखेडेंना मुदतवाढ देण्यात येऊ नये, अशी मागणी केली होती. अखेर केंद्र सरकारने आज त्यांना मुदतवाढ न देता त्यांना मूळ विभागाकडे वर्ग करण्यात आले आहे. निश्चितच हा योग्य निर्णय घेतला गेला असल्याची प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
ते पुढे म्हणाले की, “वानखेडेंना एनसीबीसाठी मुदतवाढ मिळाली नसली तरी त्यांनी जो फर्जीवाडा केला, त्याच्या तक्रारी आम्ही केल्या असून आमच्या तक्रारींवर कारवाई सुरु आहे. जात पडताळणी समितीकडे केलेल्या तक्रारीनंतर त्याची पण चौकशी सुरू आहे. लवकरच त्यावर निर्णय येईल आणि त्यांनी खोटे प्रमाणपत्र जमा केल्याचे सिद्ध होईल. त्याचबरोबर अल्पवयीन असताना स्वतःच्या नावाने सदगुरु बारचा परवाना घेतला होता. युपीएससीमधून नोकरी मिळाली असतानाही त्यांनी हा बारचा उद्योग सुरु ठेवला. तसेच दुसऱ्या लग्नानंतर त्यांनी पत्नीचा व्यवसाय आणि संपत्तीबद्दलल माहिती लपवली होती. त्याबद्दल तक्रार केल्यानंतर तपास सुरू आहे. शिवाय आर्यन खान प्रकरणात एसआयटीकडून देखील तपास सुरू आहे. ज्या तक्रारी मी केल्या होत्या, त्याचा पाठपुरावा मी करणार आहे. जिथे जिथे चुका झाल्या, बेकायदेशीर कामे झाली आहेत, त्या तक्रारी सिद्ध झाल्यानंतर त्यांच्यावर कारवाई होईल.”
महत्वाच्या बातम्या –
- शिवसेना राष्ट्रवादीने औरंगाबादचे क्रीडा विद्यापीठ तर भाजपने पीटलाईन पळवली; खा. जलील यांचा आरोप!
- शिवसेनेचा बेरोजगार महिलांना मदतीचा हात; पालकमंत्र्यांच्या हस्ते ७० शिलाई मशिनचे वाटप..!
- दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा’साठी मिळालेली रक्कम वाचून व्हाल हैराण
- यापुढेही संसदेच्या माध्यमातून जनतेच्या हिताचे प्रश्न सोडविण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन- सुप्रिया सुळे
- औरंगाबादचे होणार ‘जीआयएस मॅपिंग’ सर्वेक्षण; पालकमंत्री देसाईंच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात!

