🕒 1 min read
औरंगाबाद :औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे शहरातील मालमत्तेचे सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. मालमत्ताकर व पाणीपट्टी वसुली वाढीसाठी महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाय योजना राबविण्यात येत आहे. या अनुषंगाने औरंगाबाद महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील मालमत्ताचे जीआयएस मॅपिंग सर्वेक्षण करण्यात येत आहे. याची सुरुवात आज पालकमंत्री सुभाष देसाई(Subhash Desai) यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आली.
यावेळी खासदार इम्तियाज जलील, आमदार अंबादास दानवे, आमदार अतुल सावे, रमेश बोरणारे, प्रशासक तथा आयुक्त आस्तिक कुमार पांडेय, जिल्ह्याधिकारी सुनील चव्हाण यांची उपस्थिती होती. औरंगाबाद महानगरपालिका व स्मार्ट सिटी यांच्या माध्यमातून Amenex या कंपनी द्वारे (GIS) मालमत्ता सर्वेक्षण सुरू करण्यात येत आहे. यासाठी १५० ते २०० स्वयंसेवकांची तीन महिन्यांकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. हे स्वयंसेवक घरोघरी जाऊन सर्वेक्षणाचे फॉर्म वाटप करणार आहेत. त्यानंतर ३ ते ४ दिवसांनी मालमत्ता धारकाकडून माहिती भरून घेतील व क्यूआर कोड स्कॅन करून मोबाईल अॅपवर माहिती अपडेट करतील.
शहराचे ड्रोन सर्वेक्षण
या सर्वेक्षणासाठी येणारा खर्च स्मार्ट सिटी करणार असल्याची माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली. यासाठी महानगरपालिकेच्या वतीने १७२ किलोमीटर क्षेत्रफळाचे ड्रोन सर्व्हे करण्यात आले आहे. महानगरपालिकेला १,९२,०००० इमारती आढळून आल्या आहेत. मनपाच्या अभिलेखात २.७० लक्ष मिळकतीची नोंद आहे. या सर्व्हेक्षणाद्वारे साडेचार ते पाच लाख मिळकतीची नोंद होऊ शकते असा अंदाज व्यक्त होत आहे. सर्व प्रथम झोन ३ व ४ मध्ये याची सुरुवात होणार आहे. या स्वयंसेवकाना गणवेश आणि ओळखपत्र दिले गेले आहे, अशी माहिती उपायुक्त अपर्णा थेटे यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- …तर महाराष्ट्रातही बंगालसारखी स्थिती निर्माण होईल- विजय वडेट्टीवार
- “तुम्ही खरे की उद्धव ठाकरे?”; भाजपचा आदित्य ठाकरेंना सवाल
- विराट कोहली माध्यमांसमोर कधी येणार?; राहुल द्रविडने केला खुलासा
- प्रवीण दरेकरांचा तिन्ही पक्षांना ‘जोर का झटका धीरे से..!’, चित्रा वाघ यांचा टोला
- अभिनेता जॉन अब्राहम आणि पत्नी प्रियाला कोरोनाची लागण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
