बारामती : काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खासदारांची यादी आज(३ जाने.)जाहीर झाली असून संसदेतील खासदारांच्या कामगिरीच्या आधारे ‘पीआरएस’ या संस्थेने खासदारांची कामगिरी जाहिर केली आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे(Supriya Kule) क्रमांक एकची बाजी मारली आहे.
यासंदर्भात ट्विट करत सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत की,’या १७ व्या लोकसभा अंतर्गत नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनापर्यंत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खासदारांची यादी जाहीर झाली.संसदेच्या रेकॉर्डस् मधील नोंदीनुसार ‘पीआरएस’ या संस्थेने खासदारांची कामगिरी जाहिर केली आहे. यामध्ये अधिवेशनातील उपस्थितीसह प्रश्नोत्तरे,विविध चर्चांमधील सहभाग, खासगी विधेयके आदींचा प्रकर्षाने उल्लेख करण्यात आला आहे.ही आकडेवारी आपल्या माहितीसाठी शेअर करत आहे.आपण सर्वांनी माझ्यावर दाखविलेला विश्वास आणि प्रेम यामुळे हे शक्य झाले आहे. सहयोगी पक्ष व कार्यकर्त्यांनी मला संसदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली.आपल्या विश्वासाला सार्थ ठरविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत आहे.यातूनच मला महाराष्ट्रातील जनतेच्या हितासाठी विविध मुद्दे संसदेत मांडण्यासाठी ऊर्जा मिळते.’
या १७ व्या लोकसभा अंतर्गत नुकत्याच पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनापर्यंत सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खासदारांची यादी जाहीर झाली.संसदेच्या रेकॉर्डस् मधील नोंदीनुसार 'पीआरएस' या संस्थेने खासदारांची कामगिरी जाहिर केली आहे. pic.twitter.com/Q4imILKzt6
— Supriya Sule (@supriya_sule) January 2, 2022
दरम्यान, पुढे ते म्हणाल्या आहेत की,’यापुढेही संसदेच्या माध्यमातून मतदारसंघातील व राज्यातील जनतेच्या हिताचे प्रश्न सोडविण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन याची ग्वाही देते’
महत्वाच्या बातम्या:
- ‘एकमेकाला ओरबाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजाला सावित्रीबाईंनी सत्कार्याचा आदर्श घालून दिला’
- युगायुगांच्या बेड्या तोडणाऱ्या सावित्रीबाई रणरागिणी होत्या- अमोल कोल्हे
- ‘सावित्रीबाईंनी जे कार्य केले,त्याचे मोजमाप कोणत्याच परिमाणात करता येणं अशक्य’
- ‘सुप्रिया सुळे थापा मारताय की हे सगळेच लोकप्रतिनिधी…’, भातखळकरांचा हल्लाबोल
- ‘अंधेर नगरी घरी बसला राजा’, म्हाडा आणि एमपीएससीच्या परीक्षेवरून भातखळकरांचे टीकास्त्र


