🕒 1 min read
मुंबई : काही दिवसांपूर्वी मोहित कंबोज यांनी ट्विट करत राष्ट्रवादीला इशारा दिला होता. यामध्ये राष्ट्रवादीचा बडा नेता लवकरच माजी गृहमंत्री अनिल देशमुख आणि माझी अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना जेलमध्ये भेटेल, असा टोला लगावला होता. त्यानंतर आज राष्ट्रवादीचे कर्ज जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्यावर कंबोज यांनी निशाणा साधला आहे.
मोहित कंबोज यांचं ट्विटः
बारामती ॲग्रो लिमिटेड कंपनीचा मी सखोल अभ्यास करत असल्याचं मोहित कंबोज यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे. तसेच या संदर्भातील अधिक अपडेट लवकरच दिले जातील, असे देखील कंबोजांनी म्हटलं आहे. मोहित यांनी काही दिवसांपूर्वी एक ट्विट केलं होतं, त्या ट्विटच्या कॅप्शनमध्ये माझं ‘हे वीट सेव करून ठेवा, अनिल देशमुख, नवाब मल्लिकां पाठोपाठ आता राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याची जेलवारी’ असं त्यांनी लिहलं होतं.
रोहित पवार येणार अडचणीतः
यानंतर आज केलेल्या कंबोज यांच्या ट्विटमुळे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची आज चौकशी होण्याची शक्यता आहे. म्हणून जेलमध्ये जाणारा राष्ट्रवादीचा पुढचा नेता कोण असा प्रश्न चर्चेत आला आहे. त्यांनी केलेल्या आजच्या ट्विट वरून रोहित पवार तो पुढचा नेता असू शकतो, असा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, 17 ऑगस्ट रोजी अनिल देशमुख, नवाब मलिक, संजय पांडे, संजय राऊत यांच्या नंतरची ही गाळलेली रिकामी जागा लवकरच भरली जाईल, असं त्यांनी सांगितलं होतं. गाळलेल्या जांगेचं त्यांनी ट्विट देखील केलं होतं. शिवाय आपणा स्ट्राइक रेट 100% है!, असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं. मात्र आज त्यांनी रोहित पवार यांच्यावर थेट निशाणा साधला आहे.
महत्वाच्या बातम्याः
- Arvind Sawant | “…नाहीतर रामराज्याची भाषा करू नका”, अरविंद सावंत यांचा देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला
- Wedding| मेटाचे माजी चीफ ऑपरेटिंग ऑफिसर शेरिल सँडबर्ग अन् उद्योजक टॉम बर्नथल यांनी रचला विवाह
- Kangana Ranaut| …म्हणून फिल्मफेअर अवाॅर्ड यांनी कंगणा राणावत हिचं नाॅमिनेशन घेतलं परत
- Attack On CM Convoy । मोठी बातमी : मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर दगडफेक, स्थानिकांनी फोडल्या गाडीच्या काचा
- आदरणीय नेत्यांचा अपमान करणारे, हे कसले राम हे तर हराम- अरविंद सावंत
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
