Share

Nawab Milak | नवाब मलिकांना झटका! कोर्टाचा पोलिसांना महत्वाचा आदेश, अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल होणार

Published On: 

🕒 1 min read

Nawab Milak | वाशिम : वानखेडे प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना झटका बसला आहे. नवाब मलिक यांच्याविरोधात अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश वाशिम न्यायालयाने पोलिसांना दिले आहेत. त्यामुळे नवाब मलिक यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. मनी लाँड्रिंग प्रकरणात नवाब मलिक तुरुंगात आहेत.

नवाब मलिक यांच्या आरोपांनी कुटुंबाची बदनामी झाल्याचा आरोप समिर वानखेडे यांनी केला आहे. वानखेडेंनी २४ ऑगस्टला वाशिम सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यांनी मलिक यांच्याविरुद्ध अ‍ॅट्रोसिटीचा अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. दरम्यान, वानखेडे यांच्या तक्रारीनुसार गुन्हा नोंदवा, असा आदेश वाशिम जिल्हा न्यायालयाने पोलिसांना दिला आहे.

समीर वानखेडे मुंबई एनसीबीचे झोनल डायरेक्टर असताना त्यांनी अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खानला क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणी अटक केली होती. या प्रकरणी नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. नवाब मलिक – समिर वानखेडे हा वाद तेव्हा चांगलाच रंगला होता.

नवाब मलिक तुरुंगात –

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना ईडीने फेब्रुवारीमध्ये अटक केली होती. कुर्ल्यातील एका मालमत्तेशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात मलिकला विविध कलमांखाली त्यांना अटक करण्यात आली आहे. मात्र, मलिक यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले होते. ईडीने नवाब मलिक यांच्यावर टेरर फंडिंग आणि मनी लाँड्रिंगचे आरोप केले होते. मलिक यांचे अंडरवर्ल्डमधील लोकांशी संबंध असल्याचे सांगण्यात आले. कुर्ल्यातील गोवाला कंपाऊंडमध्ये त्यांनी शेकडो कोटींची जमीन एका पैशात खरेदी केल्याचे ईडीने म्हटले होते.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!