Share

शिवसेना राष्ट्रवादीने औरंगाबादचे क्रीडा विद्यापीठ तर भाजपने पीटलाईन पळवली; खा. जलील यांचा आरोप!

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद:औरंगाबाद शहरात होणारे क्रीडा विद्यापीठ हे पुण्याला स्थलांतरित झाले आहे. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने ते पुण्याला पळवून नेले. मात्र शहरातील सर्व राजकीय नेते गप्पच बसले. आपल्या शहरातल्या अधिकाऱ्यांना तर हे देखील माहीत नाही की क्रीडा विद्यापीठ शहरात कोणत्या ठिकाणी होणार होते आणि पालकमंत्री अजूनही आश्वासनच देत आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसने यांनी क्रिडा विद्यापीठ तर भाजपवाल्यांनी औरंगाबादची पीटलाईन पळवली. खा. इम्तियाज जलील(Imtiyaz Jaleel) यांनी अशाप्रकारे शिवसेना, भाजप आणी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.

सोमवारी (दि.३) औरंगाबाद जिल्ह्यात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत खासदार इम्तियाज जलील यांनी आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. याआधीही खा. जलील यांनी क्रिडा विद्यापीठ औरंगाबादलाच करण्यात यावे इतरत्र हलविण्यात येऊ नये यासाठी वारंवार मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर उद्योगमंत्री तथा औरंगाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी कोणत्याही परिस्थितीत क्रीडा विद्यापीठ औरंगाबाद येथेच होणार असुन त्यासाठी जागाही निश्चित झालेली असल्याचे आश्वासित केले होते. मात्र अजून पर्यंत यासाठी कुठल्याही हालचाली झालेल्या नाहीत.

क्रीडा विद्यापीठ पुणे येथे स्थलांतरीत करुन मराठवाड्यावर नेहमी प्रमाणे अन्याय करण्यात आल्याचे खासदार इम्तियाज जलील यांनी म्हटले आहे. त्याचप्रमाणे गेल्या अनेक वर्षांपासून औरंगाबाद येथे होणारी पीटलाईन केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी जालन्याला नेली आहे. खासदार इम्तियाज जलील यांनी दानवे यांना तुम्ही देशाचे केंद्रीय रेल्वेमंत्री आहात की जालन्याचे असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे जर आपण झाल्याचे मंत्री असाल तर पुढच्या वेळेला खासदारकीची निवडणूक न लढवता महानगरपालिका अथवा नगर परिषदेचे निवडणूक लढवा असा उपरोधिक टोलाही त्यांनी दानवेंना लगावला आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!