Sameer Wankhede | मुंबई : आर्यन खान (Aryan Khan) ड्रग्ज प्रकरण जेव्हा राज्यात तुफान गाजत होतं, त्याच वेळी एनसीबीचे (एनसीबी) माजी विभागीय संचालक समीर वानखेडे हे देखील तुफान चर्चेत आले होते. अशातच एनसीबीचे (NCB) उपमहासंचालक आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी ज्ञानेश्वर सिंग (Dnyaneshwar Singh) यांनी आपला छळ केल्याची लेखी तक्रार राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे समीर वानखेडे यांनी केली आहे.
आयोगाकडे केलेल्या तक्रारीमध्ये ज्ञानेश्वर सिंग यांनी काही साक्षीदारांना मारहाण केल्याचा आरोप असून वानखेडे यांच्या चौकशीची निगडीत विशिष्ट माहिती काही प्रसारमाध्यमांना देणे, वानखेडे आणि त्यांच्या कुटुबांच्या सांपत्तिक स्थितीची विशिष्ट माहिती ठरावीक माध्यमांना देणे आदी आरोप केल्याचं समोर येतं आहे.
वानखेडे यांचा धर्म आणि जातीचा मुद्दाही चर्चेत आला. मात्र, जातपडताळणी समितीने वानखेडे यांना क्लिन चीट दिली. मंगळवारी आर्यन खान प्रकरणात त्रुटी आढळल्याचा अहवाल दक्षता आयोगाने एनसीबीच्या संचालकांकडे प्रसिद्ध करत वानखेडे व त्यांच्या तत्कालीन टीममधील काही अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारस केली, त्यानंतर राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने तातडीने, केंद्रीय गृहमंत्रालयाचे सचिव, केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळाचे अध्यक्ष, केंद्रीय अप्रत्यक्ष कर मंडळाच्या दक्षता विभागाचे महासंचालक तसेच एनसीबीचे महासंचालक यांना पत्र लिहित त्यांच्यावरील कारवाईला स्थगिती देण्याचे कळविले आहे.
दरम्यान, माझा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. मात्र, या अधिकाऱ्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केला असून, त्याचे पुरावेदेखील मी आयोगाला दिले आहेत, असं समीर वानखेडे यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Deepali Sayyad | दीपाली सय्यद शिंदे गटात जाणार? म्हणाल्या, “लवकरच माझा…”
- Jayant Patil | “बंड करणाऱ्या एकनाथ शिंदे गटातील आमरांना आता पश्चाताप होता आहे”, जयंत पाटलांचा दावा
- Devendra Fadnavis |“माझे सासरे शिंदे होते, जावयाच्या ज्या काही…”; शरद पवारांच्या विधानाला देवेंद्र फडणवीसांचे प्रत्युत्तर, म्हणाले…
- Narendra Modi | मल्लिकार्जुन खर्गे यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल नरेंद्र मोदींनी केलं अभिनंदन, म्हणाले…
- Eknath Shinde | “ये तो सिर्फ झांकी है, पिक्चर अभी बाकी है”; शिंदेंचा ठाकरेंवर हल्ला


