🕒 1 min read
औरंगाबाद : कोरोनाच्या काळात अनेक महिलांचा रोजगार हिरावला गेला. अनेकींवर उपासमारीची वेळ आली. आता हळूहळू परिस्थिती सुधारत असली तरीही त्या काळात ज्या महिलांचे रोजगार गेले. त्यातील अनेक महिलांना अजून पर्यंत नवीन नोकरी मिळालेली नाही. गरजू, गरीब घरातील महिलांची हीच अडचण लक्षात घेऊन शिवसेना नेते तथा माजी खासदार चंद्रकांत खैरे(Chandrakant Khaire) यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त ७० गरजू महिलांना शिलाई मशीन वाटप केल्या आहेत.
कोरोनाच्या काळात अनेक महिलांच्या नोकऱ्या गेल्या. भांडवल व अर्थकारण यामुळे घरात बसून राहावे लागले. अनेकांनी ही अडचण शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांना लॉकडाऊन अन्नदान करतांना निदर्शनास आणून दिली. त्यामुळे विधवा, गरजू, महिलांचे सक्षमीकरण व्हावे या उद्देशाने शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांच्या वाढदिवसानिमित्त गरजू तसेच बचतगटातील महिलांना उद्योग तथा पालकमंत्री सुभाष देसाई(Subhash Desai) यांच्या हस्ते ७० शिलाई मशीन वाटप करण्यात आले.
वाढदिवसानिमित्ताने या सामाजिक उपक्रमांचा उल्लेख करत पालकमंत्री सुभाष देसाई यांनी कौतुक केले. बजाजनगर येथील त्रिमुर्ती चौकात असलेल्या सिद्धीविनायक गणपती मंदीर परिसरात झालेल्या आगळ्यावेगळ्या कार्यक्रमात महिलांनी शिवसेनेचे आभार मानले. मुलांचे शिक्षण, घरखर्च भागविण्यासाठी महिला आता शिवणकाम करून कुटुंबाला हातभार लावणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- …तर महाराष्ट्रातही बंगालसारखी स्थिती निर्माण होईल- विजय वडेट्टीवार
- “तुम्ही खरे की उद्धव ठाकरे?”; भाजपचा आदित्य ठाकरेंना सवाल
- विराट कोहली माध्यमांसमोर कधी येणार?; राहुल द्रविडने केला खुलासा
- प्रवीण दरेकरांचा तिन्ही पक्षांना ‘जोर का झटका धीरे से..!’, चित्रा वाघ यांचा टोला
- अभिनेता जॉन अब्राहम आणि पत्नी प्रियाला कोरोनाची लागण
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
