मुंबई : दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा (Allu Arjun) ‘पुष्पा : द राइज’ (Pushpa: The Rise) हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करताना दिसत आहे. हा चित्रपट तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड आणि हिंदी भाषांमध्ये प्रदर्शित झाला असून कमाईचा नवा विक्रम रचला आहे. या चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदाना मुख्य भूमिकेत आहेत. चित्रपटातील अल्लू अर्जुनच्या भूमिकेचे सर्वत्र कौतूक होत आहे. मात्र त्याला या चित्रपटासाठी मिळालेली रक्कम वाचून नक्कीच हैराण व्हाल.
अल्लू अर्जुनचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. अक्शन आणि ड्रामाने भरलेला तेलुगू चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाने आतापर्यंत तीनशे कोटींहून अधिक कमाई केली आहे. तसेच या चित्रपटात काम करणाऱ्या स्टारकास्टला देखील मोठी रक्कम ऑफर झाली. मीडिया रिपोर्ट्सनुसार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा’ या चित्रपटासाठी तब्बल ५० कोटींची ऑफर देण्यात आली.
Pushpa Raj rampage at the Box Office #ThaggedheLe ????
With housefull boards at a lot of theatres in the 1st weekend of NY 2022, #PushpaTheRise is going big ????#2021HighestGrosserPushpa@alluarjun @iamRashmika @aryasukku @ThisIsDSP @adityamusic @TSeries @MythriOfficial pic.twitter.com/wakC9poQW0
— Pushpa (@PushpaMovie) January 1, 2022
याशिवाय या चित्रपटात रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) श्रीवल्लीच्या भूमिकेत दिसत आहे. बातमीनुसार, रश्मिकाला चित्रपटासाठी आठ ते दहा कोटींची ऑफर देण्यात आली. तसेच अभिनेत्री समंथा रुथ प्रभू (Samantha Ruth Prabhu) ‘पुष्पा: द राइज’ या चित्रपटातील ‘ओ अंतवा ऊओ ऊ’ आयटम साँग करीता दीड कोटी ते दोन कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली. हिंदीशिवाय तेलुगू भाषेत रिलीज झालेल्या ‘पुष्पा द राइज बॉक्स ऑफिस कलेक्शन’ची बंपर कमाई सुरूच आहे. निर्मात्यांनी नुकतीच या चित्रपटाची सक्सेस पार्टी आयोजित केली होती, ज्यामध्ये त्यांनी सांगितले की हा चित्रपट जागतिक बॉक्स ऑफिसवर तीनशे कोटींची कमाई करेल. आणि ते घडले आहे. होय, अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ने बॉक्स ऑफिसवर तीनशे कोटींची कमाई केल्याचं जाहीर केले आहे.
महत्वाच्या बातम्या:
- ‘एकमेकाला ओरबाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजाला सावित्रीबाईंनी सत्कार्याचा आदर्श घालून दिला’
- युगायुगांच्या बेड्या तोडणाऱ्या सावित्रीबाई रणरागिणी होत्या- अमोल कोल्हे
- ‘सावित्रीबाईंनी जे कार्य केले,त्याचे मोजमाप कोणत्याच परिमाणात करता येणं अशक्य’
- ‘सुप्रिया सुळे थापा मारताय की हे सगळेच लोकप्रतिनिधी…’, भातखळकरांचा हल्लाबोल
- ‘अंधेर नगरी घरी बसला राजा’, म्हाडा आणि एमपीएससीच्या परीक्षेवरून भातखळकरांचे टीकास्त्र
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

