Share

मुश्रीफांचा रामनवमीला जन्म झालाच नाही, जनतेची केली फसवणूक – समरजित घाटगे

Published On: 

🕒 1 min read

कोल्हापूर : गोकुळ दुध संघाकडून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना वाढदिवसानिमित्त देण्यात आलेल्या शुभेच्छा फलकावर प्रभू रामांचा नाव चुकीच्या पद्धतीने छापल्याने, वाद निर्माण झाला आहे. भारतीय जनता पक्षाचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष समरजित घाटगे यांनी मुश्रीफ यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.

समरजित घाटगे म्हणाले, “मुश्रीफ यांच्या जन्मतारखेला राम नवमी नव्हती, तर ती त्यांच्या जन्मानंतर ११ दिवसांनी आली होती. यामुळे त्यांनी इतकी वर्षे जनतेची दिशाभूल केली आहे.”

समरजीत घाटगे पुढे म्हणाले, “मुश्रीफ यांच्या कायदेशीर दस्तऐवजात त्यांची जन्मतारीख २४ मार्च १९५४ दाखवली आहे. तिथीनुसार त्यांचा जन्म श्रीरामनवमी दिवशी झाला असा त्यांचा दावा आहे. मात्र सदर वर्षाचे पंचांग तपासले असता २४ मार्च रोजी रामनवमी नव्हती तर रंगपंचमी होती.१९५४ सालची श्रीरामनवमी ११ एप्रिल रोजी साजरी झाली होती. म्हणजेच त्यांच्या जन्मतारखेच्या अठरा दिवसांनंतर. रंगपंचमीला जन्माला येवून श्रीरामनवमीला वाढदिवस साजरा करणाऱ्या मंत्री महोदयांनी गेली ४० वर्षे जनतेला त्यांच्या खोट्या रंगात रंगवले आहे. मात्र आता यानिमित्ताने यातील काळा रंग आता सर्वांच्या समोर आला आहे. येथील जनतेला खोट्याचा जाब द्यावा लागेल मुश्रीफ साहेब.”

https://www.facebook.com/samarjeetdadaghatge/posts/2853001961659350

दरम्यान समरजीत घाटगे यांनी मोर्चा घेऊन येत मुश्रीफांना अटक करावी अशी मागणी केली. जो पर्यंत त्यांना अटक होत नाही तोपर्यंत पोलीस ठाण्यातून जाणार नाही अशी भूमिका घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

महत्त्वाच्या बातम्या : 

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!