मुंबई : जास्त निर्बंध आणून चालणार नाही. प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी आहे, त्यामुळे सरकारने त्यांना कोणती काळजी घ्यावी हे सांगावं, निर्बंध लावू नये, अशी प्रतिक्रीया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली होती. तसेच त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका देखील केली होती. यावर ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी उत्तर दिलं आहे.
राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलवायला हवी. राज्यात केवळ पाच पक्ष आहेत, पण तसं होत नाही. विरोधी पक्षांना विचारात घ्यायचं नसतं. राज्यात केवळ मनमानी कारभार चालू आहे, असं म्हणत पाटलांनी सरकारवर टीका केली होती. दरम्यान ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटलांना सवाल केला आहे. निर्बंधाबाबत सुचना केंद्राकडून येतात चंद्रकांत पाटील यांना निर्बंधाबाबत माहिती नाही का?, असे मुश्रीफ म्हणाले.
हसन मुश्रीफ म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी सुचना देतात त्याची अमलबजावणी आम्ही करतो. त्यामुळे नरेंद्र मोदींचा निर्णय चुकीचा असेल तर चंद्रकांत पाटलांची माहिती वरते कळवू”
- एसटी कामगार संघटनेची मान्यता रद्द, काँग्रेस इंटकच्या लढ्याला यश..
- औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या निवडणूकीत एकता पॅनलच्या १३ उमेदवारांचा विजय; महिला सभासद बिनविरोध!
- ‘कुणालातरी निवडणुका उरकण्याची…’, संजय राऊतांचा भाजपला अप्रत्यक्ष टोला
- “उत्पल पर्रीकरांनी हिंमत दाखवत शिवसेनेशी संबंध जोडला तर..” संजय राऊतांचे मोठे विधान
- यंदाचा IPL सीजन महाराष्ट्रात घेण्यासाठी शरद पवार आग्रही, …BCCI चा B प्लानही तयार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

