Share

Uddhav Thackeray | नितेश राणेंच्या ‘त्या’ वक्तव्याचा ठाकरे गटाकडून समाचार; म्हणाले, “इथली जनता त्यांचा माज…”

Published On: 

🕒 1 min read

Uddhav Thackeray | मुंबई : भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) सध्या कणकवली तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील ग्रामस्थांना थेट धमकीच दिली आहे. सगळा निधी माझ्या हातात आहे. जर माझ्या विचाराचा कुणीही सरपंच झाला नाही तर एक रुपयाचाही निधी मी त्या गावाला देणार नाही, असा थेट इशाराच त्यांनी जाहीर सभेत दिला आहे.

त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु असतानाच ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. “राणेंना सत्तेचा माज असल्यामुळे अशी वक्तव्य करत आहेत. नारायण राणेंचा माज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेने उतरला होता, तसाच सत्तेचा माज नितेश राणेंचा देखील जनता उतरवेल. त्यामुळे मतदारांनी अशा प्रवृत्तीच्या लोकांना निवडून देऊ नये”, अशा शब्दात ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik) यांनी नितेश राणेंवर टीका केली.

पुढे ते म्हणाले, “खरंतर विकास ही प्रक्रिया असते. ही सत्ता कोर्टाच्या आदेशानुसार कधीही पडू शकते. त्यामुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही. शिंदे फडणवीस यांचं सरकार येऊन सहा महिने झाले तरी नितेश राणे यांना मंत्रिपद मिळालेलं नाही. त्यांना ते मिळणार नाही. इथल्या जनतेला नम्र आवाहन आहे की, ज्याप्रकारे शिवसेनेच्या माध्यमातून विकास झाला ग्रामपंचायतीच्या माध्यमातूनही होईल.”

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महेश तापसे (Mahesh Tapase) यांनी नितेश राणे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करत निवडणूक आयोगानेच त्यांच्यावर कारवाई करून, त्यांच्या गुन्हा नोंद करावा अशी मागणी केली आहे.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!