Share

Devendra Fadanvis | मानधन वेळेत मिळण्यासाठी यंत्रणा विकसित करणार – देवेंद्र फडणवीस

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : संजय गांधी निराधार योजनेतून दिले जाणारे मानधन वेळेत दिले जाईल यासाठी यंत्रणा विकसित केली जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, संजय गांधी निराधार योजनेतून दिव्यांग, निराधार, विधवा, परित्यक्ता यांना मानधन देण्यात येते. पण कधी काही तांत्रिक अडचणीमुळे मानधन वेळेत देण्यात अडचणी येतात. पण या अडचणींवर मार्ग काढून मानधन वेळेत दिले जाण्यासाठी यंत्रणा विकसित केली जाईल.

सामाजिक न्यायमंत्री संजय राठोड यांनी या योजनेतून दिले जाणारे मानधन वाढवून देण्याबाबत शासन सकारात्मक असून ज्येष्ठ नागरिकांची वयोमर्यादा 65 वरुन 60 वर्षे करण्यासाठी तातडीने बैठक घेऊ, असे सांगितले.

या लक्षवेधी सूचनेवरील चर्चेत सदस्य सुनील कांबळे, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे आदी सहभागी झाले होते.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!