Share

IPL 2022 : CSKचा दीपक चहर गेला स्पर्धेबाहेर, तरीही मिळणार १४ कोटी; वाचा कसे!

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : वेगवान गोलंदाज दीपक चहर आयपीएल २०२२ मधून बाहेर पडला आहे. चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) हा वेगवान गोलंदाज अजूनही दुखापतग्रस्त असून तो यावर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत खेळण्याची शक्यता कमी आहे. चेन्नईने चहरला तब्बल १४ कोटी रुपयांना विकत घेतले.

चहर सध्या एनसीए, बंगळुरू येथे रिहॅब करत आहे. त्याच्या न खेळण्यामुळे गतविजेत्या सीएसकेला मोठा धक्का बसला आहे. या संघाने पहिले चार सामने गमावले होते. चहर आता टी-२० लीगमधून बाहेर पडला आहे, त्यामुळे त्याला १४ कोटी मिळणार की नाही हा सर्वात मोठा प्रश्न आहे.

दीपक चहरचा आयपीएलच्या वार्षिक करार यादीत समावेश आहे. त्याला ग्रेड-सीमध्ये स्थान देण्यात आले आहे. यानुसार त्याला दरवर्षी एक कोटी रुपये मिळतात. दुखापतीमुळे टी-२० लीगमध्ये एकही सामना न खेळल्याने त्याला पूर्ण १४ कोटी रुपये मिळतील. बीसीसीआयने (BCCI) २०११ मध्ये करार मिळालेल्या खेळाडूंसाठी विमा पॉलिसी लागू केली होती. याचा लाभ चहरला मिळणार आहे.

यंदाचा आयपीएल हंगाम सुरू होण्यापूर्वीच तो दुखापतग्रस्त झाला होता. अशा परिस्थितीत फ्रेंचायझीला त्याला एक पैसाही द्यावा लागणार नाही. बोर्ड पूर्ण पैसे देईल. चहरच्या जागी रिप्लेसमेंट म्हणून कोण येईल याची माहिती अजून आलेली नाही. मात्र आता दीपकचे स्पर्धेतून बाहेर पडणे चेन्नईला मोठे नुकसान देणारे ठरले आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

 

IPL 2022चं कव्हरेज…थेट स्टेडियममधून…फक्त महाराष्ट्र देशावर! क्रीडा विश्वातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी लॉग इन करा www.MaharashtraDesha.com

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!