मुंबई : भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांना लक्ष्य केलं असून अनेक नेते, मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप किरीट सोमय्या करत आहेत. त्यांच्या या आरोपांमुळे महाविकास आघाडीतील नेत्यांना सळो की पळो करुन ठेवलं आहे. त्यातच आता सोमय्यांनी पुन्हा एकदा ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
‘कोरोना काळात ठाकरे सरकारकडून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार सुरुच होता. सामान्य जनता लॉकडाऊनच्या झळा सोसत असताना हसन मुश्रीफ जनतेला लुटत होते. मंत्रालय 100 टक्के बंद असताना शरद पवारांचे शागिर्द 15 हजार कोटी रुपये लुटत होते’, असा गंभीर आरोप सोमय्या यांनी मुश्रीफांवर केलाय. त्याचबरोबर हा घोटाळा सिद्ध झाला असून, मुश्रीफांना आता मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणीही सोमय्यांनी केली आहे.
इतकंच नाही तर हसन मुश्रीफ यांच्या जावयाला दिलेलं 1 हजार 500 कोटीचं कंत्राट अखेर रद्द करण्यात आल्याचंही सोमय्या यांनी सांगितलं. 27 हजार ग्रामपंचायतींचा TDS रिटर्न भरण्यासाठी पुढील 10 वर्षासाठी हे कंत्राट दिलं गेलं होतं. 8 महिन्यांपूर्वी मुश्रीफांचे जावई मतीन यांनी ही कंपनी विकत घेतली, असं सोमय्यांनी सांगितलं आहे.
दरम्यान, जयोस्तुते कंपनीचा मागच्या 8 वर्षात एक रुपायाचंही आवक-जावक नाही. याचा सगळा पाठपुरावा केल्यानंतर आता ठाकरे सरकारनं हे कंत्राट रद्द केलं आहे. याबाबत तक्रार करायला जातानाच मला अडवण्यात आलं होतं. ठाकरे सरकार हे भ्रष्टाचारी सरकार आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- उच्च प्रतीच्या गांजाची नशा अजून उतरली नाही म्हणून…; चित्रा वाघ यांची राऊतांवर बोचरी टीका
- नवाब मलिक खोटारडे, मी कधी दुबईला गेलोच नाही- समीर वानखेडे
- ‘उभा महाराष्ट्र मला ओळखतो की, मी बेईमान आहे की शब्दाला पक्का आहे’
- …पण काही जण एवढी कागदपत्रं दाखवतात की जणू हेच चौकशी करणार आहेत- अजित पवार
- ‘महागाईने होरपळणाऱ्या सर्वसामान्य जनतेच्या जखमेवर भाजप पेट्रोल ओतून आग लावतात’


