🕒 1 min read
औरंगाबाद : औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या सीईओ पदाच्या वादाचा फटका ई-बसला तसेच इतर अनेक स्मार्ट कामांना बसला आहे. पर्यटन बसदेखील रखडली आहे. बस खरेदीच्या निविदेची कोणतीही कार्यवाही अद्याप सुरु झालेली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
युक्त आणि मुख्य कार्यकारी अधिकारीपद एकाच व्यक्तीकडे असल्यामुळे शहराची गरज आणि महापालिकेच्या मर्यादा लक्षात घेऊन विविध विकास कामे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून हाती घेण्यात आली. महापालिकेच्या तिजोरीत नेहमीच खडखडाट असल्यामुळे विकास कामांसाठी, नवीन उपक्रमांसाठी स्मार्ट सिटीच्या निधीचा आधार घेतला गेला. त्यामुळे शहरात सिटीबस सेवा सुरू होऊ शकली.
शहर सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला मास्टर सिस्टीम इंटिग्रेटर या प्रकल्पाचे काम सुरु झाले. संत एकनाथ रंगमंदिराच्या नुसतीनकरणाचे काम, सफारी पार्क, ऐतिहासिक दरवाजांची दुरुस्ती व रंगरंगोटी, सायकल ट्रॅक अशी विविध कामे दोन्हीही पदे एकाच अधिकाऱ्याकडे असल्यामुळे होऊ शकली. सध्या औरंगाबाद शहरात शंभर सिटीबस धावत आहेत.
त्यात पन्नास बसची भर घालण्याचा निर्णय झाला. त्यासाठी स्मार्ट सिटीच्या निधीतून तरतूद करण्याचे देखील ठरविण्यात आले. राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी ई-बस स्वरुपाच्या बस खरेदी करा आणि त्या चालवा असे आदेश दिले.
त्याच बरोबर पाच ई-बस पर्यटन बस म्हणून सुरु करा असेही त्यांनी आपल्या औरंगाबाद दौऱ्याच्या दरम्यान अधिकाऱ्यांना सांगितले होते. औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या माध्यमातून अन्य कामे केली जात असल्यामुळे ई- बसच्या प्रस्तावाकडे प्रशासनाने विशेष लक्ष दिले नाही.
स्मार्ट सिटीची टिम आता या प्रकल्पावर काम करण्याची तयार झालेली असताना मुख्य कार्यकारी अधिकारी बदलले गेले. या बदलामुळे ई-बस खरेदीची व पर्यटन बस सुरु करण्याची प्रक्रिया पुन्हा एकदा रखडली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
- पालकांनो लक्ष द्या, प्रशासनाचा ‘या’ शाळा बंद करण्याचा निर्णय
- कोविड सेंटरवर अतिप्रसंगाचा प्रयत्न करणाऱ्या डॉक्टरची हकालपट्टी, विधानसभेतही तीव्र पडसाद
- जो गुन्हा केलाच नव्हता त्याबद्दल भोगावा लागला २० वर्षे तुरुंगवास
- औरंगाबाद जि.प. सभा; उपाध्यक्ष सचिवांवर भडकले आणि..
- ‘सरकारला लाज वाटायला हवी’ इंधन दरवाढीवरून प्रकाश राज आक्रमक !
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
