Share

चिकलठाणा ते जिजाऊ चौक उजळून निघणार; आदित्य ठाकरेंनी केले प्रकाशमान रस्त्याचे उद्घाटन!

Published On: 

औरंगाबाद:औरंगाबाद महानगरपालिकेतर्फे शहरात ६० हजार एलईडी पथदिवे लावण्यात आले आहेत. चिकलठाणा ते जिजाऊ चौक पर्यंतचा रस्ता हा जालना रोडचा भाग मनपा हद्दीत असूनही हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अंतर्गत असल्याने त्यावर पथदिवे नव्हते. त्यामुळे हा भाग रात्रीच्या वेळी अंधारात असतो. यामुळे वाहतुकीसाठी नेहमी अडचण निर्माण होते. ही अडचण दूर करण्यासाठी या मुख्य रस्त्यावर एलईडी बीओटी प्रकल्पा अंतर्गत पथदिवे बसवण्यात आले आहेत.

महापालिकेने खासगी कंपनीकडून शहरात दोन टप्प्यात ५७ हजार नवीन एलईडी पथदिवे बसवले आहेत. व शहरातील सर्व प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्ती दुरुस्तीचे कामही त्याच कंपनीला देण्यात आले आहे.  त्यामुळे यापूर्वी छोट्या ठेकेदारांवर दरवर्षी होणारा नऊ कोटी रुपयांचा खर्च वाचला आहे. ठेकेदार कंपनीला कोणतीही अतिरिक्त रक्कम न देता त्यांच्याकडून आधीच्याच रकमेत दुरुस्तीचे काम आता करून घेण्यात येत असल्याने महानगरपालिकेची मोठी बचत होणार आहे.

काही वर्षांपूर्वी महापालिकेने शहरातील जुने पथदिवे बदलून वीज बचत करणारे नवे एलईडी पथदिवे बसवले होते. दोन वर्षांपूर्वी हे काम पूर्ण झाले. त्यानंतर महापालिकेने शहरातील राहिलेल्या १७ हजार जुने पथदिवे बदलल्याचे कामही याच कंपनीला दिले असून आता कंपनीने हे काम पूर्ण केले असून सुमारे ५७ हजार एलईडी दिवे शहरात बसविले आहेत.

केंब्रिज रस्त्याच्या डिव्हायडर वर डबल ब्रॅकेटचे एकूण ६५ पोलवर १३० पथदिवे उभारण्यात आले आहेत. या कामासाठी भूमिगत केबल, जंक्शन बॉक्स, दोन कंट्रोल पॅनल, आर्थिंग व माफिंग चे काम पूर्ण करण्यात आले. चिकलठाणा गाव ते जिजाऊ चौक (केम्ब्रिज शाळा) रस्ता याठिकाणी बसविण्यात आलेल्या पथदिव्यांचे उदघाटन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे(Aaditya Thackrey) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री सुभाष देसाई(Subhash Desai), आमदार अंबादास दानवे(Ambadas Danve) यांची उपस्थिती होती.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!