🕒 1 min read
औरंगाबाद: औरंगाबाद महानगरपालिकेच्या वतीने शहरातील पैठण गेट, गुलमंडी, औरंगपुरा व शहागंज या परिसरातील मालमत्ता धारकांना नियमानुसार टीडीआर देण्यात आला आहे. परंतु अद्यापही काही नागरिकांनी टीडीआर घेऊन सुद्धा सदर जागा अद्याप महानगरपालिकेकडे हस्तांतरित केलेली नाही. अशा मालमत्ता धारकांविरुद्ध ७ फेब्रुवारी पासून कारवाई करण्याचा इशारा अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख रवींद्र निकम(Ravindra Nikam) यांनी दिला आहे.
महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने शहरातील दिवान देवडी परिसरातील राजेंद्र बसैय्ये यांच्या सीटीएस नंबर ५३२८ या जागेवरील पंधरा बाय दहा या आकाराचे दुकान रस्ता बाधित असल्याने ते मंगळवारी जेसीबीच्या सहाय्याने निष्कसित करण्यात येऊन नागरिकांसाठी रस्ता खुला करण्यात आला. राजेंद्र सिताराम बसैय्ये यांनी सदर जागेचा टीडीआर स्वरूपात मोबदला घेऊन जागा मनपाच्या हक्कसोड नुसार करारनामा करून दिला होता. तरीदेखील या जागेवरून त्यांनी दुकान हटविले नव्हते. याबाबत प्रशासक यांनी यापूर्वीच कारवाई करण्या बाबत आदेशित केले होते. संबंधित जागा मनपाच्या ताब्यात देण्यासाठी मनपा अतिक्रमण विभाग प्रमुख रविंद्र निकम यांनी सुद्धा १ महिन्यापूर्वी पाहणी करून दुकान काढण्याबाबत सूचना दिल्या होत्या.
परंतु सदर अतिक्रमण धारकांनी अतिक्रमण काढले नव्हते. या पार्श्वभूमीवर १ फेब्रुवारी रोजी जेसीबीच्या सहाय्याने अतिक्रमण काढण्यात आले. तसेच औरंगपुरा मुख्य बाजारपेठ या परिसरात एकूण १२ दुकानदारांनी दुकानासमोर वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या लोखंडी जाळी लावून अतिक्रमण केले होते. ते सर्व निष्कासित करून दोन लोखंडी काऊंटर व पाणीपुरी काऊंटर जप्त करण्यात आले. ही कारवाई प्रशासक आस्तिक कुमार पांडेय(Aastik Kumar Pandey) यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पदनिर्देशित अधिकारी वसंत रामदास भोये, इमारत निरिक्षक सय्यद जमशेद यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
